कार्ले आदिवासी वाडीला जिवनावश्यक वस्तुंची मदत


कार्ले आदिवासी वाडीला जिवनावश्यक वस्तुंची मदत ;
सागर गायकवाड यांनी मुलाच्या वाढदिवसदिनी जपली सामाजिक बांधिलकी

मकरंद जाधव (बोर्लीपंचतन)
   आजकाल वाढदिवस साजरा करताना  मोठा समारोह करणे हा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. वाढदिवसासाठी मोठा समारोह करुन खर्च केला जातो.अशावेळी आपल्या आजुबाजुला काही घटक असे आहेत की ज्यांना एकवेळचे जेवण मिळवताना सुध्दा खुप यातना सहन कराव्या लागतात या गोष्टींकडे काहीजण जाणिवपुर्वक दुर्लक्ष करतात परंतु समाजामध्ये सामाजिक बांधिलकीच्या संवेदना जागृत असणाऱ्या व्यक्तिंचीसुध्दा कमी नाही. अशाच एका ठाण्यातील कल्याण-पुर्व येथील नामदेव वाडीमधील बांधकाम व्यावसायिक सागर गायकवाड यांनी आपला मुलगा कु.सोहम गायकवाड याच्या वाढदिवसानिमीत्त सामाजिक जाणिवेतुन निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आदीवासी वाडीतील कुटुंबाना सोमवार दि.२२ जुन रोजी जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करुन त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचा थोडाफार प्रयत्न केला.
  आपला मोठेपणा दाखवण्यासाठी किंवा आपण मोठा समारोह केला नाही तर लोक आपल्याला हसतील किंवा आता हे बंद कस करायचं या विचाराने काही लोक वाढदिवसारख्या समारोहात असे डामडौल करुन पैशांची उधळपट्टी करीत असतात. परंतु याचवेळी काही लोकांचे खाण्यापीण्यापासुन हाल होत असतात काहीही खायला मिळत नसते.नेसायाला पुरेसे कपडेही नसतात उपाशी पोटी कधी अर्धपोटी अपुऱ्या कपड्यात ही माणसे आपले जीवन जगत असतात.आपण जर हे खाणे,कपडे किंवा जे काही शक्य असेल ते अशा गरीब व संकटग्रस्त लोकांना दिले तर त्यांचीही गरज भागेल.आपण जो हा अवाढव्य खर्च करतो तो न करता या लोकांना अन्न,वस्र दिले तर त्यांची ती गरज थोडीफार तरी पूर्ण होईल.अशा गरजु लोकांसाठी जर आपण हा खर्च केला तर,त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा केव्हाही आपल्याला मिळालेल्या भेटींपेक्षा वाढदिवसाची मिळालेली अमूल्य भेट असेल.अशा आपल्या भावना सागर गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केल्या.
  सागर गायकवाड यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या समारोहाचा खर्च टाळुन पाठवलेली जिवनावश्यक वस्तुंची मदत बोर्लीपंचतन येथील सिध्देश तोडणकर व गौरव तोंडलेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कार्ले आदिवासी वाडीतील गरजु कुटुंबांपर्यंत पोहचवीण्यासाठी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा