‘निसर्ग’ वादळाच्या संकटात श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचे आपत्ती व्यवस्थापनाची गौरवास्पद वाटचाल
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
जगभर कोरोनाचे तांडव सुरूच आहे. दिवसेंदिवस हे संकट रुद्र रूप धारण करत आहे. या कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने हजारो लोकांना जेवण, अन्न-धान्य अशा स्वरुपात मदत केलेली आहे. आज हि कोल्हापूर पोलीस दलाला दररोज मठाच्या वतीने दररोज जेवण पुरवण्यात येत आहे. कोणत्याही आपत्तीच्या काळात आपतग्रस्तांच्या हाकेला प्रतिसाद देणारा मठ म्हणून मठाची ख्याती आहे. नेपाळ असो व केरळ पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या कुशल मार्गदर्शनाखाली शेकडो स्वयंसेवकांची फळी मदत कार्यात तात्काळ उतरलेली दिसते.
‘निसर्ग’ चक्रीय वादळाने आधीच कोरोनानेग्रस्त असणा-या महाराष्ट्राच्या संकटात अधिक भर टाकली. कोरोनाने हाताला रोजगार नाही, पोटाला पुरेस अन्न नाही अशा अवस्थेत जगणाऱ्या लोकांची परिस्थिती अचानक आलेल्या निसर्ग वादळाने अधिकच बिकट केली. एक आधार म्हणून असणारा निवारा उडून गेल्याने लोकांच्या डोक्यावरील छत्र हरवल्याचे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांची स्थिती झाल्याचे दिसून येते. कोरोनाच्या संकटात मठाचे कोठार स्वामीजींनी जनताजानार्दनासाठी रिते केले होते. तरी हि या ‘निसर्ग’ वादळाच्या संकटात लोकांचे अश्रू पुसण्यासाठी पुज्याश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी त्वरित धावले आहेत. या वादळग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वामीजींनी गवंडी, लोहार, सुतार, प्लंबर, वेल्डर, इलेक्ट्रिकल असे सुमारे १०० लोकांची टीम, सोबत सिमेंट, पत्रे, संसारोपयोगी साहित्य, कौले अशा साहित्यांचे अनेक ट्रक भरून सामान घेऊन दस्तूर खुद्द स्वामीजी लोकांचे अश्रू पुसण्यासाठी तळकोकणात उतरले आहेत.
पाजपंढरी, खरसई, खेड, दापोली, चिपळूण सह रायगड जिल्ह्यातील काही भागात हे मदतकार्य चालणार आहे. स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली मठाच्या वतीने घरांच्या छताची मापे घेवून छत उभारण्याचे काम पहिल्या काही तासातच सुरु झाल्याचे पाहून स्वामीजींच्या अचूक नियोजनाबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुनर्वसनासाठी सिद्धगिरी निसर्ग वादळ मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून, सर्वच आपतग्रस्तांना लाभ मिळावा म्हणून समाजातील दानशूर दात्यांनी पुढे यावे असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे. आपण आपली मदत घर बांधणी, दुरुस्तीसाठी विटा, सिमेंट, पत्रे, वाळू. लोखंडी सळई, बांधकाम साहित्य, दरवाजे, खिडक्या, इलेक्ट्रिकल साहित्य, संडास-बाथरूमसाठी लागणारे प्लंबिंग साहित्य, कौले (जुनी असली तरी चालतील), मेणबत्ती,काडेपेटी, शैक्षणिक साहित्य- वह्या, कंपास, पेन, स्कुल बॅग अशा स्वरूपात अथवा आपण आर्थिक स्वरूपात हि मदत करू शकता. आपण आपली आर्थिक मदत पुढील खात्यात जमा करू शकता. बँक खाते तपशील - ‘सिद्धगिरी गुरुकुल फौंडेशन’ इंडियन बँक, शाखा- शाहूपुरी, कोल्हापूर चालू खाते नंबर : 6134137407,IFSC No. IDIB000k044.
पूज्यश्री स्वामीजींचे विचार, कार्य, श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाचे उपक्रम,याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी फेसबुक पेजला भेट द्या : https://www.facebook.com/Siddhagiri.Kolhapur
Post a Comment