सरपंच आशुतोष पाटील पाटलांनी मांडली आ. प्रवीण दरेकरांन समोर गावची व्यथा

पुष्कर रिळेकर : श्रीवर्धन
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांचा कोकण दवरा.. वेळास आगर मधील नुकसानीचा घेतला आढावा
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायतदारांबरोबरच अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. कोकणवासियांचे सरकारवर उपकार आहेत. त्यामुळे कोकणवासियांना या संकटाच्या परिस्थितीत सरकारने भरपूर मदत करावी. त्यांची थट्टा करु नये; अन्यथा भारतीय जनता पार्टी टोकाची भूमिका घेईल, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे.
    रायगड जिल्ह्याला 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहे. त्यांनी आज (9 जून) श्रीवर्धन मतदारसंघामधील उद्ध्वस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणचा दौरा केला. 
ते म्हणाले की, अनेक बागायतदारांच्या आंबा व नारळाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून अनेकांची घरे पडून अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, रोहा, तळा, मुरुड, पेण, पोलादपूर या तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व मंडणगड या तालुक्यांचे चक्रीवादळानेे मोठे नुकसान केले आहे. बागायतदारांचे जवळपास 18 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. माझा दौरा सुरुवातीला झाल्यानंतर मुख्यमंत्री रायगडात आले व त्यांनी रायगड जिल्ह्यासाठी तुटपुंजी मदत जाहीर केली. एसडीआरएफ व एनडीआरएफ संकटकाळात मदत देत असतात; मात्र सरकारने कोकणवासियांना भरीव आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.
 33 टक्के ते 50 टक्के पडझड झालेल्या घरांना एक लाख रुपये तर पूर्ण पडलेल्या घरांना तीन लाख रुपये मदत सरकारने द्यावीअशी मागणी आम्ही करीत आहोत, असे प्रवीण दरेकर म्हणाले. तसेच नुकसान झालेल्या बागायतदारांच्या आंबा व नारळ यांच्यासाठी खुंटी कलम करण्याची मागणी त्यांनी केली. कोविडमध्ये भाजपाने प्रचंड सेवाभावी कार्य केले. कोकणच्या संकटात भाजप मदतीसाठी उभी राहिली आहे. एकही घर पत्र्याशिवाय राहणार नाही, असे सांगत उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी भाजपच्या माध्यमातून 16 ट्रक पत्रे आले आहेत. सौर उर्जेवर चालणार्‍या दिव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आणखी ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचे काम करणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.

कोकणात बागायतदारांबरोबरच काम करणार्‍या मजुरांची अवस्था बिकट झाली आहे. कोकणाने संकट काळात इतर जिल्ह्यांना वेळोवेळी मदत केली आहे. आता तेथील जनतेनेे कोकणला या संकटमय परिस्थितीत मदत करावी, असे भावनिक आवाहन दरेकर यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते, उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, तालुकाध्यक्ष संजय ढवळे, व कार्यकर्तेही उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा