विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर ०९ जून रोजी श्रीवर्धनच्या दौर्‍यावर


मुंबई प्रतिनिधी
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उद्या, 9 जून रोजी श्रीवर्धनच्या दौर्‍यावर येत आहेत. निर्सग चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. या वादळात मोठी हानी झाली असून, नुकसानग्रस्त श्रीवर्धन मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी प्रविण दरेकर उद्या या ठिकाणी येणार आहेत. या दौर्‍यात आमदार भाई गिरकर, आमदार प्रसाद लाड, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी उपस्थित राहणार आहेत.

श्रीवर्धन मतदार संघ दौर्‍याची सुरुवात सकाळी 10 वाजता मोरबा येथील चक्रीवादळग्रस्त गावांचा पाहणी दौरा करुन करण्यात येईल. त्यानंतर सकाळी 11.30 च्या सुमारास म्हसळा येथील चक्रीवादळग्रस्त गावांचा पाहणी दौरा करण्यात येईल. दुपारी 12.30 च्या सुमारास श्रीवर्धन येथील चक्रीवादळग्रस्त गावांचा पाहणी दौरा केला जाईल. दुपारी 1.30 च्या सुमारास श्रीवर्धन प्रांत-तहसीलदार कार्यालयात महसूल, पोलीस, कृषी, वैद्यकीय, विद्युत वितरण, ग्रामविकास अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. सायंकाळी 4 वाजता रायगड जिल्ह्यातील चक्रीवादळग्रस्त गावांची पाहणी करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा