प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
नुकसान ग्रस्त रायगडची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार उद्या मंगळवारी ९ जून रोजी दक्षिण रायगड मध्ये येणार आहेत.
निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील १३ तालुक्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, रोहा, माणगाव, अलिबाग, पेण या तालुक्याना बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडची पाहणी करून १०० कोटींची तातडीची मदत जाहीर केली. या नुकसानग्रस्त दक्षिण रायगड जिल्ह्याच्या परिस्थितीचि पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार उद्या मंगळवार दि ९ जून रोजी येत आहेत. सकाळी ११.३० वाजता शरद पवार यांचे आगमन माणगाव मध्ये होणार असून तिथल्या नुकसान ग्रस्त परिसराची पाहणी केल्यानंतर ते म्हसळा येथे १२.३० दरम्यान पोहचून प्रत्यक्ष पाहणी करतील त्यानंतर दुपारी १ वाजता दिवेआगर येथे ते पोहचतील. तर २ वाजता श्रीवर्धन मधून पोहचवून तिथल्या नुकसान ग्रस्तांची पाहणी करतील. सांयकाळी ४ वाजता ते श्रीवर्धन मध्ये पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आदीं सोबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर ५ वाजता हरिहरेश्वर येथे पोहचून तिथल्या नुकसानाची पाहणी करतील. पाहणी करून झाल्यावर सांयकाळी ६ वाजता बागमांडला मार्गे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीकडे प्रयाण करतील.
Post a Comment