संघटनेच्या अध्यक्षपदी श्री. नरेश सावंत, तर सेक्रेटरी श्री. अण्णासाहेब बिचुकले
म्हसळा - शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या म्हसळा तालुक्यात शिक्षकांच्या हक्काची प्राथमिक शिक्षक संघ संघटना म्हसळा शाखेची स्थापना करण्यात आली व नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.सूर्यकांत करंजीकर व श्री.निलेश साळवी यांनी म्हसळा तालुका कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी माननीय श्री.बबनजी मनवे साहेब- सभापती कृषी व पशुसंवर्धन राजिप अलिबाग व गटशिक्षणाधिकारी श्री.शेडगे साहेब यांनी म्हसळा कार्यकारिणीचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यकारिणी मध्ये, अध्यक्ष श्री नरेश जयवंत सावंत, सेक्रेटरी श्री अण्णासाहेब संदिपन्न बिचुकले, कार्याध्यक्ष श्री.राजेश दत्तात्रय खटके, कोषाध्यक्ष श्री जयसिंग शंकर बेटकर, कार्यालयीन चिटणीस श्री.इक्बाल अ. गफूर कौचाली, जिल्हा उपाध्यक्ष श्री.अरविंद बाळकृष्ण मोरे ईत्यादी सदर पुढील विस्तारीत कार्यकरणी काही महिन्यांत विस्तार करण्यात येणार आहे.
हि संघटना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर काम करत असून शिक्षकांच्या हक्काचे , जिव्हाळ्याचे विषय, विविध मागण्या, शिक्षकांच्या अडचणी झटत असते. सध्या कोविड 19 या भयंकर आजारात शिक्षकांवर शासनाने मोठी जबाबदारी दिली आहे आणि ती जबाबदारी शिक्षक वर्ग आदेशानुसार पार पाडत आहेत अशा आजारात शिक्षक वर्ग कामाची अंमलबजावणी करत असताना या शिक्षक बांधवांना या कोरोना आजार बाबत कामातून मुक्तता आवश्यक आहे अशा परिस्थितीत संघटनेचे अध्यक्ष श्री सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन चे प्रांत अधिकारी,म्हसळा तालुक्यातीचे सन्मानिय तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन शिक्षकांची समस्या मांडण्यात आली.याबाबत अधिकारी वर्गाने समाधानकारक चर्चा केली. तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करित असून भविष्यात तालुक्यात या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर चालणा देण्याचे काम करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.नरेश सावंत यांनी सांगितले.
Post a Comment