म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत म्हसळा तालुक्यातील श्री पद्मश्री दत्तअमर क्रीडा मंडळ रुद्रवट यांच्या तर्फे याआधी कोरोना आणि आता निसर्ग चक्री वादळाचे संकट अशा दुहेरी नैसर्गिक आपत्तीने हैराण झालेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. दि.03 जून रोजी झालेल्या चक्री वादळात गावातील बहुतेक घरे उध्वस्त झाली असल्याने अन्नधान्य आणि रोजच्या जीवनावश्यक वस्तू पावसात भिजून गेल्या आहेत त्यामुळे लोकांची उपासमार होऊ लागली आहे.
गोरगरीब नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेऊन श्री पद्मश्री दत्तअमर क्रीडा मंडळ रुद्रवट यांच्या तर्फे 68 कुटुंबाना कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. गावातील सर्व कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्याने नागरिकांनी क्रीडा मंडळाचे आभार मानले.
यावेळी घुम-रुद्रवट ग्रामपंचायतचे सरपंच केतन आग्रे, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजय रटाटे, उपाध्यक्ष संतोष बोर्ले, सचिव परेश आग्रे, सहसचिव संदिप आग्रे, माजी अध्यक्ष राजेश रटाटे, अनंत आग्रे, महेश आग्रे, विशाल आग्रे, प्रविण शिगवण, विनायक शिगवण, मंगेश आग्रे, मनोज काप यांसह मंडळाचे 78 सदस्य उपस्थित होते.
Post a Comment