जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ३८ आधिकाऱ्यांची टीम श्रीवर्धन -महाड विधानसभा क्षेत्रांत दाखल होणार : नुकसानग्रस्तांच्या मदतकार्यात गती येण्यासाठी साधणार जलद समन्वय
संजय खांबेटे : म्हसळा
जिल्ह्यात दि. 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मुख्यत: दक्षिण रायगड मधील श्रीवर्धन व महाड विधानसभा क्षेत्रामधील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव,महाड, पोलादपूर या तालुक्यांमध्ये घरे, शेती, फळझाडे, विविध शासकीय इमारती, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,रस्ते, वन विभाग, राज्य परिवहन, शिक्षण इत्यादींचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून दक्षिण रायगडमधील नुकसानग्रस्त गावांमध्ये तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.त्यामध्ये गतीमानता,सूसूत्रता व समन्वयक ही भूमिका पार पाडण्याचेपार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी दिलीप हळदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्या मुख्यालयांतील कार्यालयामधील आणि काही क्षेत्रीय अधिकारी दक्षिण रायगडमध्ये नैसर्गिक आपत्ती मदतकार्यासाठी निघाले आहेत.
प्रत्यक्षात झालेले नुकसान व तातडीने आवश्यक असलेल्या मदतकार्याची व्याप्ती पाहता उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन यांच्याकडे अधिकारी-कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्याने मदतकार्यात गती येण्यासाठी व गावांमध्ये तातडीने मदत पोहोचविण्याच्या कामामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (सा.प्र.), उपजिल्हाधिकारी(रोहयो), उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा), कार्यकारी अभियंता(बांधकाम), कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा), जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच उत्तर रायगडमधील क्षेत्रीय स्तरावरील गटविकास अधिकारी, पनवेल, गटविकास अधिकारी, उरण, गटविकास अधिकारी, कर्जत, गटविकास अधिकारी, खालापूर, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, पनवेल, तहसिलदार पनवेल, तहसिलदार उरण, उपविभागीय अधिकारी, कर्जत, तहसिलदार, कर्जत, तहसिलदार, खालापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल, उप उपविभागीय अभियंता पनवेल-1, उपअभियंता, उरण, उप उपविभागीय अभियंता, भिंगारी, उप उपविभागीय अभियंता, कर्जत 1, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अलिबाग, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अलिबाग, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क-सर्व, रायगड कृषी विभाग, कृषी उपसंचालक (SAO Office), उपसंचालक (आत्मा), अन्न व औषध प्रशासन विभाग, सहाय्यक आयुक्त (ड्रग) अन्न व औषध प्रशासन पेण, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन पेण, मत्स्य व्यवसाय विभाग सहाय्यक आयुक्त मस्त्य व्यवसाय रायगड या सर्वांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने दक्षिण रायगडकडे धाव घेतली आहे.
"जिल्हा प्रशासनाकडून दक्षिण रायगडमधील नुकसानग्रस्त गावांमध्ये तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. त्यामध्ये गतीमानता,सूसूत्रता व समन्वयक ही भूमिका पार पाडण्याचे पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी दिलीप हळदे यांच्या मार्गदर्शना खाली जिल्ह्या मुख्यालयांतील कार्यालयामधील आणि काही क्षेत्रीय अधिकारी अशी ३८ जणांची टीम दक्षिण रायगडमध्ये नैसर्गिक आपत्ती मदतकार्यासाठी डेरे दाखल होणार"
Post a Comment