रायगड जिल्ह्यात गिधाडांची संख्या वाढवणा-या 'प्रेमसागर मेस्त्री' यांच्या कार्यास "निसर्ग " चक्रीवादऴाने खंड
गिधाडांची घरटी असलेली झाडे चक्रीवादऴात नष्ट झाल्याने गिधाडांचा ईतरत्र प्रवास ; तालुक्यातील गिधाडांची संख्या रोडावली
म्हसऴा : अरुण जंगम
दिसायला किळसवाणा तरीही स्वभावाने खूपच शांत असलेल्या व सध्या दुर्मीळ होणारा पक्षी म्हणजे गिधाड. या पक्षाचे संवर्धन रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात होत असुन सिस्केप या संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री याने गिधाडांची संख्या नेसर्गिक पद्धतीने वाढविण्याची चळवळ उभी करून तेथील जंगल टिकविण्याचे काम केले आहे. हेच काम आता पर्यावरण संतुलनासाठी मार्गदर्शक ठरत आहे.
श्रीवर्धनला जाताना म्हसळ्याच्या अलिकडेच देहेन, भापट परिसरातून वर पाहिलं तर आकाशात घिरट्या घालणारा पक्षांचा थवा आपल्या नजरेत येतो तो पक्षी म्हणजे गिधाड. म्हसळा तालुक्यातील चिरगाव-बागेची वाडी हे सध्या गिधाडांचे आश्रयस्थान बनले असुन या चिरगाव-बागेची वाडी येथील 31.21 हेक्टर क्षेत्रफळातील व समुद्रसपाटीपासून 350 ते 450 फूट उंचीवर असलेल्या जंगलात आंबा, अर्जून, बेहडा, शेडाम, वनभेंड, इरडा सातविण या जातीच्या उंच व दरीच्या कठड्यावरील झाडांवर गिधाडांची घरटी पाहायला मिळतात. घरटीच्या आसपास साधारणत: 20 ते 25 गिधाडांचा वावर आणि आकाशात 38 ते 40 गिधाडांचा विहार पाहायला मिळतो. म्हसळा वनखाते आणि चिरगाव-बागेची वाडी येथील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून महाडच्या सिस्केप संस्थेचे प्रमुख प्रेमसागर मेस्त्री यांनी मागील वर्षांपासून म्हणजेच 1997 पासुन गिधाड संवर्धनाची नैसर्गिक मोहीम राबविल्याने सध्या गिधाडांच्या संख्येत वाढ झालेली दिसूून येत होती. ही गिधाडांची संख्या 250 ते 300 च्या आसपास होती.
मात्र 3 जुन रोजी आलेल्या 'निसर्ग' चक्रीवादऴामध्ये म्हसऴा तालुक्यासहीत लगत असणा-या गावांना जबरदस्त फटका बसला असुन घरांवरील पत्रे,कौले तसेच छप्पर उडुन जावुन मोठ्याप्रमाणात वित्तीय हानी झाली.म्हसऴा तालुका हा संपुर्णपणे डोंगराने व्यापला असुन तालुक्यातील बहुतांश गावे देखील डोंगरात वसलेली पहावयास मिऴतातपरंतु या वादऴाने तालुक्यातील बहुतेक वनराई नष्ट झाली असल्याचे देखील पहावयास मिळते.संपुर्ण डोंगरभागातील या गिधाडांची घरटी असलेली झाडे या वादळात नष्ट झाली असल्याचे सिस्केपचे संस्थापक प्रेमसागर मेस्त्री यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
या वादळामध्ये अंगणवाड्या, प्राथमिक शाऴा,तसेच ईतर शासकीय कार्यालयांना देखील मोठा फटका बसला आहे सदर नुकसानीचा पाठपुरावा त्या सदर विभागांचे वरीष्ठ अधिकारी सरकार कडे करतील मात्र सिस्केपने अविरत मागील अनेक वर्षापासुन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी राबविलेल्या या गिधाड संवर्धन कामाचा पाठपुरावा सरकार दप्तरी कोण करणार ? हा प्रश्न आता उपस्थीत होत आहे.
या वादळात गिधाडांची घरटी असलेली झाडे उन्मऴुन पडल्याने या सिस्केपच्या कार्यास खंड पडला आहे.वादऴापुर्वी या भागात गिधाडांची साधारणत:40 पिल्ले घरट्यांमध्ये होती मात्र वादऴानंतर म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यात बचाव पथकास फक्त
7ते 8 पिल्ले आढळली असल्याचे प्रेमसागर मेस्त्री यांनी ही माहीती दिली व गिधाडांची संख्याही 30ते 40 वरअसुन ईतर गिधाडांनी वादऴाचा ज्या भागात प्रभाव नव्हता त्या ठिकाणी स्थलांतर केले असावे अथवा वादळामध्ये सापडले असावे असेही सांगितले असा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगितले.
पक्षीमित्र व सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले की भारत देशातून गिधाडांची जवळपास 97 टक्के संख्या संपलेली आहे. उरलेल्या तीन टक्के गिधाडांच्या जातींमध्ये लाँगबील व्हल्चर व व्हाईटबॅक व्हल्चर या दोन जाती आपल्या रायगड जिल्ह्यात सापडतात. म्हसळा तालुक्यातील चिरगाव या गावातील जंगलात व्हाईटबॅक व्हल्चर म्हणजे पांढ-या पाठीचा गिधाड या जातीच्या गिधाडावर काम सुरू आहे. 2000 ते 2004 मध्ये चिरगाव याठिकाणी पांढ-या पाठीच्या गिधाडाच्या काॅलनीचा शोध लागला. त्यावेळी या गिधाडांची साधारणत: दोन घरटी आढळली. आता आजमितीस 2020 पर्यंत या गिधाडांच्या घरट्यांची संख्या 28 झालेली आहे तर या जातीची एकूण गिधाडांची संख्या 200ते 250 पर्यंत पोहचलेली दिसून येत होती. एका घरट्यामध्ये गिधांडांची जोडी साधारण 15 ते 20वर्ष राहतात व तेथेच ही गिधाडे वास्तव करुन विणेच्या हंगामामध्ये पिल्ले जन्मास येतात. ही संख्या वाढविण्यात व येथील वनराई वाढवण्यात इथल्या ग्रामस्थांनी व विशेषत तत्कालीन सरपंच किशोर घुलघुले यांचे अथक प्रयत्न उपयोगी पडले आहे. झाडांची संख्या वाढल्याने झाडांवर घरटी वाढविण्यात गिधाडांना शक्य झाले. वेळोवेळी संस्थेच्या माध्यमातून मृत जनावरांचा पुरवठा केल्यामुळे त्यांच्या वीणेच्या हंगामात पिलांना चार ते सात दिवसात पुरेसे अन्न मिळू लागले. जे पूर्वी स्वच्छतेच्या नावाखाली ढोरटाकी बंद केल्यामुळे त्यांना मृत जनावरे मिळत नव्हती. येथील संवर्धनाचं वैशिष्ट्य म्हणजे या गिधाडांना बंदिस्त न करता त्यांना निसर्गात विहरू देत त्यांना त्यांचेच खाद्य नैसर्गिक पद्धतीने भक्षण करण्यास दिल्यामुळे हा बदल दिसून आला आहे असेही मेस्त्री यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.
1) या गिधाडांची संख्या आजमितीस 30ते 40 असली तरीही त्यांची स्थलांतर होण्याची शक्यता फार कमीअसुन पुढील आठवड्यात वन विभागाच्या मदतीने म्रुत जनावरांचे मांस व न मिळाल्यास सात ते आठ बोकडांचे मांस त्यांना घातल्यानंतर त्यांची संख्या निश्चित होईल .
2)सद्य स्थितीत या वादळाने अनेक घरांवरचे कौल व पत्रे गेले असल्याने या घरांना एक महीना पुरेल ईतके घान्य वाटप करीत असल्याची माहीती प्रेमसागर मेस्त्री यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
3) गिधाडांना बंदिस्त जाऴीत न ठेवता त्यांना विणेच्या हंगामात योग्य आहार देवुन त्यांची संख्या वाढविणारा देशातील हा पहीला उपक्रम आहे
4)गिधाडांच्या संख्येत होणारी ही वाढ निसर्गाचा समतोल राखला जातोय हे निश्चित करीत असली तरीही आलेल्या या वादळाने पुन्हा एकदा निसर्गाचा समतोल बिघडविण्याचे काम केले आहे त्यामुऴे नष्ट झालेली वनराई नव्याने पुन्हा उभारल्यास निसर्गाचा समतोल राखला जाईल.
4) य़ेणा-या काही काऴामध्ये या ठिकाणी गिधाड संवर्धन व माहीती केंद्राची स्थापना होणार होती तसेच जैवविविधता संबंधी पर्यटनातुन या गावचा विकास करण्याचा या सिस्केप संस्थेचा विचार होता असे संस्थापक प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले.
Post a Comment