"निसर्ग" चक्रीवादळाचे म्हसळ्यामध्ये थैमान सुरू , म्हसळा तालुक्यासाठी प्रस्तावीत "कोव्हिड१९ सेंटर" वरील पत्र्याचे छप्पर उध्दवस्त, तालुक्यात अनेक घरांचे नुकसान
म्हसळा : सुशील यादव
अपेक्षेप्रमाणे "निसर्ग" चक्रीवादळाचे म्हसळ्यामध्ये थैमान सुरू , म्हसळा तालुक्यासाठी प्रस्तावीत "कोव्हिड१९ सेंटर" म्हणजेच आय.टी.आय. च्या वरवटणे येथील इमारतीवरील पत्र्याचे छप्पर उध्दवस्त झाले आहे, तालुक्यात अनेक घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये तालुक्यातील मौजे कोळे येथील रहिवासी विलास चाळके यांच्या घरावरील संपूर्ण छप्पर "निसर्ग" चक्रीवादळाच्या तडाख्याने उडुन गेले आहेत. तसेच म्हसळा शहरातील घनसार लॉजवरील व प्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायीक डॉ . सुधीर चोचे यांच्या देखील इमारती वरील पत्र्याची शेड कोलमडून पडली आहे.त्याचप्रमाणे शहराबाहेर कादरी पेट्रोल पंपा शेेेजारी स्टार भारतासमोर झाडाची मोठी फांदी कोसळली आहे. निसर्ग चक्रीवादळास संपूर्ण सक्रिय होण्यास दुपारी साधारण ३.०० वाजतील , त्याआधीच म्हसळा तालुक्यात अनेक गावांत "निसर्ग" चा प्रकोप जाणवत आहे.
Post a Comment