चक्रीवादळ : आपल्या नुकसानीचे फोटो, व्हिडिओ काढून ठेवा; जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांपर्यंत पोहचायला वेळ जात आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी शासकीय यंत्रणेला आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत उशीर होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी घरे, गोठे , फळबागांच्या आदी नुकसानीचे फ़ोटो, जमल्यास व्हिडीओ आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात काढुन ठेवा.
आपल्याला विनंती आहे शासन आपल्यापर्यंत पोहचले नाही पोहचले तर आपण स्वतः स्थानिक तलाठ्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा.
छायाचित्रे, व्हिडीओ काढलेले असल्यास त्या आधारेदेखील आपल्या नुकसानीचा पंचनामे केले जातील असे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा