प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
श्रीवर्धन तालुक्यातील मौजे मारळ येथील मुळ रहिवासी श्री. देवेंद्र बांद्रे हे नालासोपारा येथे मोलमजूरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. लाॅकडाऊन काळात त्यांच्या हाताला काहीच काम नसल्याने ते आपल्या परिवारासह मुळगावी मौजे मारळ ता. श्रीवर्धन जि. रायगड येथे पायी चालत निघाले होते. माणगाव नजीक आले असता त्यांच्या पत्नी सलोनी यांचा दि. ६ मे २०२० रोजी अकस्मात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. श्री. देवेंद्र बांद्रे यांची परिस्थिती हलाकीची असून त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत मिळावी यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री कु आदिती तटकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री. उध्दवजी ठाकरेजी व उपमुख्यमंत्री माननीय ना. श्री. अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.
Post a Comment