पनवेल मनपा हद्दीत कोरोनाचे नवे 13 रुग्ण; बाधित रुग्णांची संख्या 156 वर



पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूंचे संक्रमण थांबताना दिसत नाही. विशेष करून घरामध्ये संसर्ग शिरल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत पनवेल मनपा हद्दीत नव्याने तेरा रुग्ण सापडले आहे. त्यामध्ये मुंबई व नवी मुंबईत जाणार्‍या परिचारिकांचा समावेश आहे. 
खारघरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना लागण झाली आहे. कुटुंबप्रमुख याअगोदर कोव्हीड-19 पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यापासूनच कोरोना विषाणूंची इतरांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  कामोठे सेक्टर - 5, मारुतीधाम सोसायटी येथील 56 वर्षीय व 23 वर्षीय अशा 2 व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत.  या दोन्ही व्यक्ती मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा मानखुर्द येथे कार्यरत आहेत. कामाच्या ठिकाणीच दोघांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. 
खारघर सेक्टर-21 तपोवन सोसायटी येथील 49 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. ही व्यक्ती एपीएमसी फ्रुट मार्केट  वाशी येथे क्लर्क म्हणून कार्यरत आहे. कामोठे सेक्टर-21 गौरीशंकर सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 51 वर्षीय व 24 वर्षीय अशा 2 महिला कोरोना पॉझिटीव्ह आल्या आहेत. या कुटुंबातील कुटुंबप्रमुख पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असून त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यापासूनच या महिलांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. 
कळंबोली सेक्टर-4 गुरुकीला कॉम्प्लेक्स येथील 41 वर्षीय महिला कोरोना विषाणूने संक्रमित झाली आहे. तीा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये स्टाफनर्स म्हणून कार्यरत आहे. कामोठे सेक्टर-36 सुरज कॉम्प्लेक्स येथील 46 वर्षीय महिला कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. ती केईएम हॉस्पिटल मुंबई येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. पनवेल जोशी आळी सहयोग नगर येथील 49 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाला आहे. ही व्यक्ती दादर येथील अदी फार्मासी येथे फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे. 
खारघर सेक्टर-34 येथील साई मन्नत बिल्डिंग, डी - विंग येथील एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती कोव्हीड-19 पॉझिटीव्ह आल्या आहेत. त्यांचे कुटुंबप्रमुख एसईबीआय बीकेसी, मुंबई येथे कार्यरत आहेत. याआधीच ते कोव्हीड 19 पॉझिटीव्ह आले होते. त्यांच्या पासूनच या पाच जणांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
दरम्यान, आज अखेर येथील बाधित रुग्णांची संख्या 156 वर पोहोचली आहे. यातील 69 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून, त्यांनी कोरोनाला यशस्वी मात दिली आहे. तर सद्यस्थितीत 80 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा