कोकणी डॉक्टर असोसीएशन व म्हसळा नगरपंचायतीने म्हसळा कराना दिल्या "आर्सेनिक अल्बम ३० " गोळ्या




संजय खांबेटे :  म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा नगरपंचायत हद्दींतील सुमारे ३२०० घरांतील ११ हजार लोकसंखेला आसैनिक अल्बम ३० च्या गोळ्या वाटपाचा कार्यक्रमाचा आज कोकणी डॉक्टर असोसीएशन व म्हसळा नगरपंचायतीच्या माध्यमातून लॉक डाऊन व सोशल डीस्टंस ये नियमांचे पालन करुन शुभारंभ करण्यात आला यावेळी नगराध्यक्षा श्रीमती जयश्री कापरे, उपनगराध्यक्ष शुहेब हळदे, मुख्याधिकारी मनोज उर्कीडे, डॉ. नसीम खान, डॉ.एम.एस.राऊत, डॉ.सुशिल यादव, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, माजी नगराध्यक्ष श्रीमती कविता बोरकर, माजी नगराध्यक्ष फातिमा हुरजूक, नगरसेवक संजय कर्णिक,करण गायकवाड, सेजल खताते,शीतल मांडवकर,तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष बाबू शिर्के,सामाजिक संस्थेचे सलमान पठाण, फारुक मेमन, योगेश करडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मा. नगराध्यक्ष कांबळे यानी सदरचे औषध आयुष मंत्रालय दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोविड १९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम ३० या होमी ओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होतो असे म्हटले आहे यामुळे नगरपंचायतीने कोकणी डॉक्टरांचे सहकार्याने संपूर्ण नगरपंचायतीचे हद्दीत व वाडीवर नगरसेवकांच्या माध्यमातून वाटण्यात येणार आहेत.  
                  

                                 

"अर्सेनिक अल्बम ३०या गोळ्या प्रतिबंधासाठी जरुर आहेत, त्या आपण सर्वानी घ्यायच्या आहेत , "सामाजिक अंतर आणि मास्क लोकांच्या रोजच्या जीवनशैलीचा एक भाग असायाला पाहीजे तो बऱ्याच काळापर्यंत अनिवार्य केला जाऊ शकतो."
श्रीमती जयश्री कापरे , नगराध्यक्षा नगरपंचायत म्हसळा.



"आयुष मंत्रालय दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोविड १९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम ३० या होमीओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होत आहे असे म्हटले आहे. सदर गोळयांचे सेवन अंश पोटी ४ गोळ्या दिवसातून एकदा केवळ तीन दिवस घेयच्या आहेत."
डॉ. नसीम खान, म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा