म्हसळ्याचा हापूस - पायरी आंबा रस्त्यावरी : आंबा बागायतदार शेतकरी कमी भावामुळे हवालदील



संजय खांबेटे :  म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यात यंदा आंबा पिक बरे असले तरी कोव्हीड ( १९) कोरोना मुळे मुंबई - वाशी -पुणे -सांगली -सातारा या भागात लॉक डाऊनमुळे आंबा निर्यात होत नसल्याने म्हसळा तालुक्यातील आंबा विक्रीची सर्व भिस्त म्हसळा शहर व आस पासच्या मेंदडी, खामगाव, आंबेत या निमशहरी गावांवर आली आहे. म्हसळ्यातील आंबा दर्जेदार व उच्च प्रतीचा असूनही एकीकडे मुंबई - पुणे येथील मार्केट यार्ड बंद व पर्यटन बंद असल्यानने आंबा -पायरी फळे केवळ रु ६० ते १०० प्रति डझन भावाने विकली जात आहेत. या वर्षी आंबा भाव खात नसला तरी गिऱ्हाईक भाव खायला लागल्याने आंब्याचा भाव दिवसें दिवस उतरत आसल्याचे स्थानिक बागायतदार सांगत आहेत.म्हसळा तालुक्यात आंबा पिकाखाली १८७९ हेक्टर क्षेत्र आहे.तालुक्याचे अर्थकारण आंबा आणि मत्स्योत्पादनावर अवलंबून आहे. यावर्षी अतिवृष्टी आणि सतत वातावरणातील बदल यामुळे आंबा उत्पादन २० ते ३० टक्क्याने घटले. त्या सोबतच ऐन हंगामात कोरोनामुळे विक्री व्यवस्था कोलमडली व सर्वच पातळीवर भाव पडले.सध्याच्या घडीला हापूसला महाराष्ट्रात, देशात आणि परदेशातही मागणी नाही.सुरुवातीला चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला. आता तर संपूर्ण आशिया खंडात कोरोनाने हाहाकार घातला असल्याने त्याचा हापूस आंब्याच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे.तालुक्यातील बागायतदार आडते यांचा थेट मार्केटशी संबध आसल्यााने त्याना थेट ग्राहकांजवळ माल पाठविणे सहज शक्य झाले नाही. त्यामुळे म्हसळयात भाव पडल्याचे सांगण्यात येते.

" तालुक्यतील बहुतांश आंबा बागायती या २-३ वर्षाच्या कराराराने घेतल्या जातात यावर्षी सततच्या हवामानातील बदल, उत्पादनांत येणारी घट, कोरोनामुळे विक्री व्यवस्था ढासळली त्यामुळे भाव उतरले"
शकूर हुर्जुक ,आंबा बागायतदार, म्हसळे.



 कोरोना संकटामुळे देशभरात लॉकडाऊन झाल्याचा फटका श्रीवर्धन म्हसळा येथील हापूस आंबा बागायतदारांनाही बसत आहे. हापूसच्या हजारो पेट्या आजही पडून आहेत.आंबा बागायतदार भीषण संकटात आले आहेत, आज सुध्दा आम्ही ६०-८०-१०० प्रतिडझन या उत्पादन किमतीपेक्षा कमी दराने आंबा आम्ही विकत आहोत. -नदीम दळवी, आंबा विक्रेता




Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा