तळा नगरपंचायतीच्या हद्दीत पहीला कोरोना पाँझिटीव्ह रूग्ण ; संख्या पोहचली आठ वर.


तळा (किशोर पितळे)
तळा तालुक्यात कोरोनाने हात पाय पसरण्यास सुरुवात केली असून ग्रामीण भागात विविध ठिकाणी कोरोना रूग्ण सापडले असताना आता शहरातील वाडीवस्ती कडे वक्रदृष्टी केली असल्याचे दिसून येत आहे.नगरपंचायतीच्या हद्दीतील जोगवाडी भागातील ५५वर्षीय महीला कोरोना पाँझिटीव्हआढळून आली आहे.हि व्यक्ती स्थानिक असून कामा निमित्ताने मुलुंंड मुबंईत सर्व कुटुंबासह असते. ते मे महिन्याची सुट्टी असल्याने कुटुंब गावीआले होते. त्यांना स्वतःच्या घरात काँरन्टाईन करण्यात आले होते. तीला तापाची लक्षण दिसू लागल्याने तीला उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे अँडमिट करण्यात आले होते दरम्यान स्वँब तपासणी करण्यात आली होती रिपोर्ट जे.जे.हाँस्पिटलकडे पाठविण्यातआले होते रिपोर्टआज प्राप्त झाला असून पाँझिटीव्ह आला आहे.रूग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचारचालू आहेत त्यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झालेआहे. सदर व्यक्ती कोणाच्या हि संपर्कात आली नसल्याने घाबण्याचे कारण नाही.नगरपंचायत प्रशासनाने संपूर्ण शहरात सँनीटायझेशन करण्यात आले होते.वेळोवेळी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी उपाय योजना व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सोशलडिस्टंट पाळणे.मास्कचा वापर करा गरजअसेल तरच बाहेर पडा.घरात रहा.सुरक्षीत रहा सँनीटारझरचा वापर करा अशा सूचनाची जनजागृती करण्यातआल्या होत्या.सदर जोगवाडी येेथे सुरक्षित रहाण्यासाठी प्रत्येकांंनी काळजी घ्या.सोशल डिस्टंट ठेवा.कमीत कमी संपर्क ठेवा मास्कचा वापर करा. 
नागरिकांनी घाबरून जावू नये प्रशासनाला सहकार्य करा.असे महसूल प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा