तळा तालुक्यातील तारणे गावाजवळील अवघड वळणावर सिमेंट ट्रक पलटी.पादचारी महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू.
तळा (किशोर पितळे)
तळा तालुक्यातील मांदाड रोडवर मौजे तारणे गावाजवळील अवघड वळणावर तळा येथून मांदाड कडे जाणाऱ्या एम.एच.४६एआर/८२०५ सिमेंट ट्रकचा काल सकाळी ९ च्या दरम्यान अपघात झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान पादचारी महिला या अपघातात जखमी झाली असून
प्रार्थमिक उपचार करून झालेल्या वृद्ध महिलेला पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारा दरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झाला आहे.लक्ष्मी जानू काटे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे.पोलीस ठाणे कडून मिळालेल्या माहितीनुसार जे.एम.म्हात्रे इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनी पनवेल यांचे आगरदांडा ता. मुरुड येथे रस्ता बांधकाम सुरू आहे.त्या कामासाठी
jsw सिमेंट कंपनीचा हा ट्रक असून तळा मार्गाने
जात असता अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यानेअपघात घडला असून ट्रक चालक फरार झाला तळा पोलीस ठाण्यात भा.द.वि.क्र.२७९,३३७, ३३८ मोटार वाहन अधिनियम१९८८ ,१८४ १३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री सुरेश गेंगजे हे करीत आहेत. इंदापूर ते मांदाड हा रस्ता नव्याने करण्यात आला आहे काही महीन्यापुर्वी इंदापूर तळा मार्गावरछोट्या
वळणावर डिझेल टँकर पलटी झाला होता.वळणावर काही प्रमाणात तांत्रिक चुका असल्याने वाहनांवरचा ताबा सुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत या रस्त्यावर यापूर्वी देखील असेच लहान मोठे अपघात घडले असून शासनाने या नवीन रस्त्याचे टेक्निकल ऑडिट करणे गरजेचे आहे जेणे करून असे अपघात घडणार नाहीत असेजाणकारांकडूनबोलले जातआहे.
Post a Comment