इंदापूर येथील मिनीडोर चालकाचा प्रामाणिकपणा ; साडेतीन लाखांचा ऐवज केला परत


म्हसळा वार्ताहर
कोविड-१९ कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण आर्थिक विवंचनेत असताना नालासोपारा येथून म्हसळा तालुक्यातील खरसई गावातील मेंदडकर कुटुंबातील सदस्यांना इंदापूर येथील मिनिडोर चालक सचिन बाबरे यांच्या प्रामाणिकपणामूळे लाखोंचा ऐवज परत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लॉकडाऊन मूळे नालासोपारा येथे  अडकलेल्या मूळचे म्हसळा तालुक्यातील खरसई गावचे रहिवासी असलेले मेंदडकर कुटुंबातील काही सदस्य नालासोपारा येथून गावाला पायी चालत निघाले होते.पनवेल पर्यंत पोहचल्यानंतर मिनीडोर चालक सचिन बाबारे यांनी चालत येणाऱ्या दोन व्यक्तींना मानवतेच्या दृष्टिकोनातून वाहनात घेतले.दरम्यानच्या प्रवासात पोलिस चेकनका असल्याने त्यातील प्रवाशी उतरून तपासणी करून घेण्यासाठी उतरून गेले व आपल्या बॅगा त्या मिनीडोर रिक्षात विसरून गेले.त्यामध्ये अंदाजे तीन लाखांचे दागिने व रोख रक्कम ७० हजार रुपये होते.सदर प्रवाशी खरसई येथे पोहचल्या नंतर बॅगांची शोधाशोध सुरू झाली मात्र उशीर झाला होता.मात्र मिनीडोर चालक बाबरे यांनी इंदापूर येथे पोहचल्यानंतर बॅगांच्या मूळ मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मोठ्या प्रयत्नाने मूळ मालक असलेल्या मेंदडकर कुटुंबीयांना त्या बॅगांसह लाखोंचा ऐवज व रोख रक्कम प्रामाणिकपणे परत केल्याने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.अशा कठीण प्रसंगात दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल अजूनही माणुसकी जिवंत असल्याची चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा