संग्रहित छायाचित्र
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात दि. 03 मे 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र आता लॉकडाऊन कालावधी दि.03 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.17 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत लागू करण्यात आले आहेत.
राज्याच्या विविध भागात नोकरी, शिक्षण व अन्य कारणांमुळे नागरिक अडकून राहिलेले आहेत. या नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. अशा नागरिकांची वाहतूक करणेबाबत मार्गदर्शन सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार प्रति किलोमीटर करिता रु.44/- अधिक प्रति बस रु.50/- अपघात सहाय्यता निधी याप्रमाणे बसेस उपलब्ध करुन दिल्या जातील.
बसच्या मागणीकरिता संबंधित आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक 24 तास कार्यान्वित राहणार असून ते पुढीलप्रमाणे-
विभागीय कार्यालय पेण-8275066400,
महाड आगार-02145-222139,
अलिबाग आगार-02141-222006,
पेण आगार-02143-252001,
श्रीवर्धन आगार-02147-222241,
कर्जत आगार-9762114558/8830396138/ 8999038451,
रोहा आगार-02194-234447,
मुरुड आगार-02144-274710/8087268601,
माणगाव आगार-02140-263533.
बसेस आरक्षित करताना पुढील नियमांचे पालन करणे बंधनकारक आहेत. प्रवास करु इच्छिणाऱ्या नागरिकांनी शासनाने विहित केलेले प्रवासास अनुमती देण्यात आल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रवाशाने आपले ओळखपत्र अथवा आधारकार्ड सोबत ठेवावे. नागरिकांना बसच्या प्रवास मार्गाने सुरुवातीचे ठिकाण त शेवटचे ठिकाण अशाच प्रवासास परवानगी देण्यात येईल. मार्गातील मधल्या थांब्यावर थांबता येणार नाही. बसमध्ये सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करावयाचा असल्याने एका बसमध्ये जास्तीत जास्त 22 प्रवाशांस प्रवास करता येईल. तसेच प्रवाशांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. या बसेस लॉकडाऊन पुरत्याच मर्यादित राहतील, असे राज्य परिवहन, रायगड विभाग पेण श्रीमती अनघा बारटक्के यांनी कळविले आहे.
Post a Comment