तब्बल ५० दिवसांनी रस्त्यावर दिसली लालपरी : म्हसळ्यातील ४३ मजुरांना घेऊन श्रीवर्धन आगारातील पहिल्या २ एसटी बस पनवेलला रवाना
म्हसळा(निकेश कोकचा)
लॉकडाउनच्या काळात कामहीन झालेल्या म्हसळ्यातील ४३ परप्रांतीय मजुरांना घेऊन श्रीवर्धन आगारातील पहिल्या दोन एसटी बसेस पनवेल रेल्वे स्थानकापर्यन्त सोडण्यात आल्या.यावेळी ५० दिवसांनी सर्वसामान्यांची लालपरी रस्त्यावर धावती पाहून म्हसळेकरांना सुखद धक्का मिळाला.
लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असणार्या परप्रांतीय मजुरांवर उपासमाराची वेळ आली होती.या सर्व मजुरांना आपआपल्या गावी पाठवण्याच्या शासनाच्या सूचनांचे म्हसळा तहसील कार्यालयातून पालन करीत मंगळवारी तब्बल ४३ मजुरांना मध्यप्रदेश या राज्यात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली.या ४३ मजुरांमद्धे ९ बालकांचाही समावेश आहे.म्हसळा बायपास येथे सरकारी डॉक्टर श्री.काटे यांनी थर्मल मशीन द्वारे या मजुरांचे तापमान तपासून आरोग्य तपासणी केली.यानंतर तहसीलदार शरद गोसावी,नायब तहसीलदार के.टी.भिंगरे,सर्कल दत्ता कर्चे,तलाठी कैलास पाटील,माने,गिरे व कोतवाल अमोल यांनी या मजुरांना पुढील प्रवासाठी पानी व बिस्किटची व्यवस्था करून दिली.या सर्व मजुरांना म्हसळा येथून पनवेल रेल्वे स्थानक येथे सोडण्यात आले.या नंतर पनवेल रेल्वे स्थानक येथून रेल्वेच्या माध्यमातून त्यांना आपल्या राज्यात रवाना करण्यात आले.
फोटो- म्हसळा येथून ४३ परप्रांतीय मजुरांना रेल्वे स्थानका पर्यन्त बस मधून पाठवण्यात आल्याचे दिसत आहे.
Post a Comment