तळा येथे सापडला कोरोना पाॅजेटीव्ह रुग्ण ; धारावी येथुन आलेल्या तरुणास लागण.


तळा (किशोर पितळे)
कोरोनाने  संपूर्ण जगाला वेढले असून शहरी भागातून ग्रामीण भागात देखील हातपाय पसरण्यास सूरूवात केली आहे. जिल्ह्यातील श्रीवर्धन, पोलादपूर,महाड,या तालुक्या पाठोपाठ तळा तालुक्यातील तळेगांव येथील २१वर्षीय तरूणाला लागण झाल्याचे रिपोर्ट पाँझीटीव्ह आला आहे. 
लाॅकडाऊन मध्ये मुंबई येथील हाँटस्पाँट धारावी परिसरातुन तळा तालुक्यातील आपल्या गावी तळेगाव येथे आलेल्या एकाचा कोरोना रिपोर्ट पाॅझेटीव्ह आला आहे.त्यामुळे कोरोनामुक्त असलेल्या तळा तालुक्यात पहीला कोरोना पाॅझेटीव्ह रुग्ण आढळुन आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.तालुक्यातील शासकीय यंत्रणाअधिक सक्रिय झालीअसुनप्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.दि.७/५/२०२० रोजी धारावी येथुन आल्यानंतर सदरच्या व्यक्तीला तळेगाव येथील राजिप शाळेत अलगीकरण करण्यात आले होते यावेळी त्याच्या खाण्यापिण्याच्या साहीत्यासह त्याला तेथे ठेवण्यातआलेदि.८/५/२०२० रोजी त्याच्यामध्ये तापाची लक्षणे दिसू लागल्याने त्याला माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात अलगीकरण करण्यात आले.९ मे रोजी त्याचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती तळा तालुक्याचे तहसीलदार श्री.अण्णाप्पा एम.कनशेट्टी यांनी दिली.या रुग्णास पुढील उपचारासाठी पनवेल येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
         तळा तालुका कोरोनामुक्त ठेवण्यासाठी येथील प्रशासन कार्यरत आहेत.अनेक उपाययोजना करित जागरुकता व सतर्कता निर्माण करत आहेत.मात्र तालुक्यातील तळेगाव येथील मुंबई वास्तव्यास असणारा एकवीस वर्षीय युवक गावाकडेआला.
मिळालेल्या माहितीनुसार प्रायव्हेट गाडीने पनवेल मार्गे तळा येथे पोचल्याचे पुढे येत आहे.तालुक्यातील प्रवेशद्वारापाशी चेकपोस्ट लावण्यात आल्याने बाहेरुन येणारे नागरिक यांची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी केली जाते व आरोग्य यंत्रणे कडुन त्यांची तपासणी करुन होम काॅरंटाईनचे शिक्के मारुन गावात अलगीकरण करण्यात येते.सध्या त्याची आई आणि भाऊ व या तीघांनी ज्या गाडीत प्रवास केला त्या वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे ही अलगीकरण करण्यात आले आहे.तळेगाव येथील ज्या राजिप शाळेत या तीघांना ठेवण्यात आले होते तेथील आसपासचा विभाग सिल करण्यात आला आहे.
        
"मुंबईतील धारावी येथून हा तरुण तळा येथे आलाहोता. मात्र येथे आल्यानंतर त्याला ताबडतोब क्वारंटाईन करण्यात आले होते.त्यामुळे त्याचा कोणाशीही संपर्क आलेला नाही.आरोग्य खात्याने प्रसंगावधान राखत चांगली कामगिरी केल्यामुळे काळजी करण्यासारखे काही नसुन नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.असे आवाहन केले आहे."
-श्री.अण्णाप्पा कनशेट्टी , तहसिलदार तळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा