तळा (किशोर पितळे)
तळा तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातले High Risk मध्ये असलेल्या व्यक्तींचे swab नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून सर्वांचे नमुने negative आले आहेत.ही दिलासादायक बातमी असून सद्यस्थितीत समाधान व्यक्त केले जात आहे.कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेले ड्रायव्हर सह सहाजणांना काँरन्टाईन करण्यात आले होते या सहा जणांचे स्वँब नमूने माणगांव उपजिल्हा रुग्णालय मधून पाठवण्यात आले होते.ते रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.हि तळा तालुक्यासाठी दिलासादायक बातमी असली तरी नागरीकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.असे तहसील कार्यालया कडून समजते.लाॅकडाऊनमध्ये मुंबई येथील धारावी परिसरातुन आपल्या गावी तळेगाव येथे आलेल्या एका तरुणाचा कोरोना रिपोर्ट पाॅझेटीव्ह आला होता. त्यामुळे तळा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरलेले असताना आता दिलासादायक बातमी समोर आली आहे.या तरुणाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचा स्वँब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते आज दि.१४/५/२० रोजी त्यांचा अहवाल प्राप्त झाला असुन सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले असल्याची माहीती तळा तहसिल कार्यालयातुन मिळाली आहे या रिपोर्टमुळे तळेवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला असलातरी मुंबई उपनगरातुन विशेष करुन नालासोपारा विरार, बोरिवली येथुन अनेक चाकरमानी तालुक्यात दाखल होत आहेत.मुंबईकरांना गाव पातळीवर दक्षता कमिटी, ग्रामस्थ चांगल्याप्रकारे सहकार्यकरतअसताना आलेल्या मुंबईकरांनी सतर्क राहुन सँनीटायझरचा वापर,मास्क वापरणे,२८ दिवस शहरात गावात न फिरणे,सोशल डिस्टंट राखणे गरजेचे आहे आपल्या बरोबर आपल्या कुटुंबातील माणसांची काळजी घेणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे प्रशासनाकडे कोणतेही माहीती लपवून ठेऊ नये प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Post a Comment