तळा(किशोर पितळे)
कोरोना विरोधातील लढ्यात पोलिस महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असताना पोलिस दलातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणझाल्याचे वास्तव चित्र समोरआल्याने खळबळ उडाली आहे.महाराष्ट्रात सद्यस्थितीत ५३१ पोलीस कोरोना बाधीत आहेत. तरीही न डगमगता पोलिस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहे. दिवस असो की, रात्र पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे.दुसरीकडे पोलिसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काळजी घेण्यात येत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून संचारबंदी असल्याने तळा शहरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.तसेच राखीव पोलिसांचा फौजफाटा ही सज्ज आहे.अधिकारी, कर्मचारी अशा सर्वांवर बंदोबस्ताची जबाबदारी असून विनाकारण नागरिक घराबाहेर पडणारनाहीत यासाठी पोलिस विशेष लक्ष ठेवून आहेत.कोणीअडचणीत सापडल्यास त्याला मदतीचा हातही पोलिस पुढे करत असून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यां विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जात आहे.आतापर्यंत पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली. गाड्याही जप्त केल्या.तसेच नागरिकांची गर्दी होणार नाही, याबाबत पोलिस दक्षता घेत आहेत. वाहतूक पोलिसही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या चालकांवर कारवाई करीत आहेत. जनता कर्फ्यूपासूनआतापर्यंत दिवसरात्रपोलिस बंदोबस्ताच्या कामात व्यस्त आहेत, तरी पोलिस दलातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.
तळा पोलीस निरीक्षक श्री.गेंगजे यांनी सुध्दा शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. स्वतःबळीचा नाका,हाँटेल आसावरी चौकात,नाक्या,नाक्यावर उभे राहून बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना सोशल डीस्टन्सींग पाळण्याचे आवाहन करत आहेत तर बाहेर भटकणाऱ्यांना समजावून आणि मुजोरी केेली तर मागून फटक्याचा प्रसाद या धर्तीवर पोलीस निरीक्षकांनी कामगीरी सुरू केली आहे. येणा-या जाणा-या प्रत्येक व्यक्तीची जिव धोक्यात घालून कसून तपासणी करणे सुरू केले आहे. शहरात येणा-या रस्त्यांवर पोलीस तैनात करून भटक्यांना महाप्रसाद सुध्दा देणे सुरू आहेे. पोलीस खाते स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी भर रस्त्यावर उतरून कोरोनाचे दुष्परिणाम सांगत आहेत. तर जनतेचे रक्षण करणा-या पोलीसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना आखण्याची गरज असल्याचे बोलले जातआहे.घरातून बाहेर पडू नका असा इशारा पोलीस विभाग देत आहे. तरी सुध्दा काही लोक बाहेर पडतांना दिसत आहेत. पुढील काळात जनतेने बाहेर फिरणे सुरूच ठेवले तर पोलीस खाते कोणाचीही गय करणार नाही असे चित्र निर्माण होण्याची वेळ आली असल्याचे पोलीस सांगत आहेत.
Post a Comment