दिवेआगर येथे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन गरजुंना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप



मकरंद जाधव : बोर्लीपंचतन
संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे शासनाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून संपुर्ण देशात टाळेबंदी जाहीर केली आहे.त्यामुळे या कठीण काळामध्ये ग्रामीण भागामध्ये जे हातमजुरी करणारे लोक आहेत त्यांची उपासमार होत असल्याने त्यांचे दु:ख दुर करण्याच्या उद्देशाने सध्या सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेल्या अनेकांच्या घरच्या चुली विझल्या आहेत.रोज खर्चासह दवाखाना व इतर खर्चाची जुळवाजुळव कशी करायची हा प्रश्‍न या गरीब कुटुंबापुढे उभा ठाकला आहे. अशा भिषण परिस्थितीत समाजातील अनेक लोक देवदुत बनून या कुटुंबांच्या मदतीसाठी धावून येत आहेत.व आपल्या परिने त्यांना यथाशक्ती शक्य ती मदत करीत आहेत.या मदतीमुळे या कुटुंबांतील व्यक्तींच्या जीवनाला मोठी उभारी मिळत असून काही दिवस तरी त्यांच्या घरची चुल विझणार नाही याची शाश्‍वती निर्माण झाली आहे.
   लॉकडाऊनमुळे गोरगरीबांपुढे उद्भवलेल्या या विदारक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून खासदार मा.श्री.सुनीलजी तटकरे व राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे व आमदार श्री.अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे गरीब व गरजू लोकांना मंगळवार दि.५ मे रोजी सरपंच उदय बापट व त्यांचे सहकारी यांनी सामाजिक अंतराचे पालन करीत घरोघरी जाउन जीवनावश्यक वस्तूंचे २००किट वाटप करुन या गरीब गरजु कुटुंबाना सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानकडुन मदतीचा हात देण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुहास मार्कंडे राकेश केळसकर तसेच ग्रामस्थ मयुर पाते,प्रतिक रसाळ,सिध्देश कोसबे,देवेंद्र नार्वेकर  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा