म्हसळ्यातील परप्रांतीय जाणार आपापल्या घरी : तीन दिवसांत ७९१ लोकांनी घेतला आरोग्य दाखला



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
लॉकडाउनमुळे जिल्ह्यात देशाच्या विविध कानाकोपऱ्यातील नागरिक फसले आहेत. या नागरिकांना त्यांच्या गावी परत जायचे आहे. तसेच त्यासाठी हे नागरिक आरोग्य प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालये त्याच पध्दतीने म्हसळा तालुक्यातून परप्रांतात किंवा परजिल्ह्यांत जाण्यासाठी त्यांची थर्मलस्कॅनिंग करण्यात येत आहे. तसेच आरोग्य तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास या रुग्णांना त्वरीत उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात येणार आहे.हे नागरिक प्राप्त झालेले आरोग्य प्रमाणपत्र घेऊन जिल्हा प्रशासनाकडे ऑनलाईन अर्ज करत आहेत. या ऑनलाईन अर्जावर त्या त्या प्रांतातील तहसीलदार जिल्हाधिकारी निर्णय घेत आहेत असे सांगण्यात आले.
म्हसळा शहरातील आरोग्य पथकानी मराठी शाळा नं १ मध्ये फ्यू, सर्दी -खोकला व म्हसळा बाहेरील प्रांत, जिल्हा मध्ये स्थलांतरीत होणाऱ्यांसाठी नागरीकाना आरोग्य विषयक दाखला देण्यासाठी T. H. O. डॉ. गणेश कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली डॉ. सागर काटे, डॉ. प्रियल भगत , sister श्रीमती गढरी , म्हशीलकर, नांदगावकर यांची टीम कार्यरत आहेत व त्याना महसूल व पंचायत समीतीचे आधिकारी मदत करीत आहेत.
संपूर्ण देशात कोरोंना विषाणूंचा प्रसार झपाट्याने होत आहे.हा प्रसार थांबवण्यासाठी अथवा प्रसाराची गती मंद करण्यासाठी सोशल डिस्टेन्सी, मास्क लावणे हे सक्तीचे असताना याबाबत सर्व काही दुर्लक्षीत होते. यातील काही परप्रांतीय कधी गावाला जाणार याबाबत विचारल्यास सांगू शकत नसल्याने शासन अशा स्थलांतरीतानादाखले कसे देते याबाबत काही चर्चा करीत होते. 

"शासनाकडून मदत मिळत आसल्याचे कळते जाहीर केलेली मदत आम्हा कामगाराला अद्याप मदत मिळाली नाही ."
जोखू कश्यप, गवंडी बिगारी

"म्हसळा शहरात मी गेले २० वर्ष रहात आहे, बहुतांश ठीकाणी बिगारी कामे बंद आसल्याने खायचे हाल झाले आहेत म्हणून गावाला जायचा निर्णय घेतला आहे"
महमदभाई, मजूर

" मागील तीन दिवसांत ७९१ त्यांच्या प्रांत , जिल्हयांत जाण्यासाठी दाखला देण्यात आले,सोशल डीस्टंससाठी नगर पंचायत व पोलीस प्रशासन मदत करत असते. गेले दोन ते तीन महीने, हात धुणे, मास्क सक्तीने वापरणे व सोशल डीस्टंस बाबत शासन जनजागृती करते याचे प्रत्येकाने भान राखणे गरजेचे आहे"
डॉ. गणेश कांबळेT.H.0, म्हसळे


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा