तळा (किशोर पितळे)
तळा तालुक्यात परराज्यातून मोलमजुरी साठी आलेले मजूर, कामगार स्वगृही (मुळ गावी) परतण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या तळा तहसील कार्यालयात
विना विलंब आँनलाईन अर्ज भरले गेले आहेतकोरोना विषाणूजन्य ससंर्ग संक्रमण रोखण्यासाठी देशात २२ मार्च पासून लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहेत्यामुळे गावाकडे जाऊन शेती व्यवसाय किंवा इतर धंदेकरुनउदरनिर्वाह करता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे आपल्या गावाकडे जाणार आहेत ठिकठिकाणी अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यानुसार रायगडात अडकून पडलेल्या मजुरांनीही आपले अर्ज दाखल केले आहेत. आजपर्यंत तालुक्यात साधारण दोनशेच्या वर अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी जवळपास दोनशे जण परप्रांतीय आहेत तर राज्याच्या इतर जिल्ह्यात जाणारे पंचाहत्तर आहेत हे नागरिक अर्ज तहसील कार्यालयात दाखल करून प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी लवकरच निर्णय घेऊन ज्यांच्या त्यांच्या गावाला पाठवण्याची सोय करतील असे समजते. महाराष्ट्रातील इतर राज्यात जाण्यासाठी, परराज्यात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मध्यप्रदेश उत्तरप्रदेश, झारखंड,बिहार, गुजरात, राजस्थान, लखनौ अशा राज्यात जाणारे कामगार आहेत परप्रांतीयांना आरोग्य प्रमाण पत्राची अट शासनाने शिथिल केली असून या सर्वांची शासन मोफत थर्मल स्कँनिग (टेस्ट) प्रस्थान स्थळी केली जाणारआहे.तळा तालुक्यात असणारे मजूर, कारागीर, कामगार तब्बल ४४ दिवसांनी स्वतःच्या राज्यात, गावाकडे,घरी जायला मिळत असल्याने या सर्वांच्या चेहर्यावर समाधान दिसत होते.
"मी गेले वर्षभर तालुक्यात सोलर उर्जा किट व्यवस्था सुरु करण्यासाठी प्रयत्न केला जेणे करून सौर ऊर्जेचा वापर जास्त प्रमाणात करून ईलेक्ट्रीकचा होत असणारा वापरापेक्षा स्वस्त पडतो वसर्व सामान्य माणसाला परवडणारा असल्याने करीत होतो परंतु या लाँकडाऊनने व जागतिक आर्थिक मंदी असल्याने व्यवसायावर गदा आली आहे. व उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे माझ्या मूळगावी राजस्थान येथे जात आहे."
-भरत परमानंद टन्वी, राजस्थान
Post a Comment