खासदार सुनिल तटकरे यांनी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांना होत असलेल्या अडचणी जिल्हा प्रशासनाचे लक्षात आणुन दिल्याने आंबेत पुल रहदारीचा मार्ग मोकळा.
म्हसळा -वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे माजी दिवंगत मुख्यमंत्री,आंबेत गावाचे भूमिपुत्र बॅ.ए.आर.अंतुले यांनी त्यांचे कार्यकाळात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आणि अत्यंत आवश्यक असणारा सावित्री नदीवरील आंबेत पुलाची बांधणी करून इतिहासात नाव कोरून ठेवले आहे.वरील दोन जिल्ह्यातील लगतच्या गावातील लोकांना आजूबाजूला शहराकडे जाणारा आंबेत पुल हा महत्वाचा दुवा आहे.सद्यस्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही ठिकाणी विषाणू संसर्ग रुग्ण सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्रीनदी जोडमार्गावरील आंबेतपुल वाहतुकीसाठी आणि नागरिकांना रहदरीस तीन दिवसांपासुन प्रशासनाचे आदेशानुसार टाळेबंद करण्यात आला होता.आंबेत पुल बंद केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रल,पंदेरी, बाणकोट आदि शेजारील गावांतील लोकांना बाजारराहाट,वैद्यकीय सेवा सुविधा घेण्यासाठी माणगाव, गोरेगाव,महाड,अलिबाग ठिकाणी जावे लागते त्यातच शेतीचा हंगाम जवळ आल्याने अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यासाठी दोन जिल्ह्यातील लोकांना आंबेत पुल मार्ग हा एकमेव महत्त्वाचा दुवा आहे.सद्या आंबे काढणी व खरेद विक्री सुरू असल्याने आंबा बागायत दारांना आजूबाजूच्या गावांत जावे लागते.आंबेत मार्गच बंद करण्यात आल्याने आणि लॉकडाउन कालावधीत लोकांच्या दैनंदिन व्यवहारात पुरता खोलंबा पडला असताना आणि अत्यावश्यक सेवेची गरज असताना आंबेत मार्ग बंद केल्याने त्याचा परिणाम म्हाप्रल येथील बाजारपेठेवर तसेच मुख्य शहरातील अत्यावश्यक सेवेवर होत होता.कोरोना प्रादुर्भाव समस्सेत बंद केलेल्या रहदरीचे समस्येमुले नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली.आंबेत पुलमार्ग पुर्ववत चालु करण्यासाठी लोकांनी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांचे कडे मागणी केली असता खासदार सुनिल तटकरे यांनी रायगड,रत्नागिरी जिल्हाअधिकारी,तहसिलदार यांचेकडे संपर्क साधून दोन दिवस बंद करण्यात आलेला हा मार्ग जिल्हा प्रशासनास सुरू करण्यास सांगितल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकुन खासदार सुनिल तटकरे यांना धन्यवाद देत असल्याचे आंबेत येथील समाजसेवक नाविदभाई अंतुले यांनी माहिती देताना सांगितले.वास्तविक पाहता रहदारी बंद करून कोरोना प्रादुर्भाव थांबवता येणार नाही तर लॉकडाऊन कार्यकाळात अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त लोकांनी विनाकारण बाहेर फिरायला जावु नये,या कालावधीत शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आहे.परंतु कोरोना बाधित लोक न ऐकल्याने आपले देशात व राज्यात अशा प्रकारचे रुग्णांत वाढ होत आहे.अशा कारणाने आंबेत रत्नागिरी पुल मार्ग हा मुख्य रहदारीचा मार्ग बंद झाल्याने लोकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती ती खासदार सुनिल तटकरे यांचे प्रयत्नाने वेळीच सुटल्याने येथील जनतेने खासदार व जिल्हा प्रशासनास धन्यवाद दिले आहेत.
Post a Comment