"लॉक डाऊन ३" ४ मे १७ मे कालावधीत नगरपंचायत कायदा तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार.



(म्हसळा प्रतिनिधी)
जिल्ह्यात कलम 144 (1) नुसारचे मनाई आदेश 17 मे पर्यंत लागू करण्यात आले आहे. या कालावधीत सर्व किराणा, औषध, दूध,डेअरी व्यवसाय सुरू रहाणार, अन्य दुकाने बंद रहाणार, शहरात मुख्य बाजारपेठ सोडून सिंगल दुकाने सुरु रहातील ,Social Distancing व मास्क आवश्यक रहाणार आहे, मास्क न वापरणाऱ्यांवर प्रतिव्यक्ती रु५००, दुकाना समोर सामाजीक अंतर (Social Distancing) नसल्यास दुकानदाराला रू१००० व ग्राहकाना रु२००, रस्त्यावर थुंकल्यास रु ५०० दंड आकारण्यात येणार आसल्याचे म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज अर्कीर्डे यानी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा