मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)
प्रस्थापित साहित्यिकांकडून नवोदित साहित्यिकांची होणारी उपेक्षा आणि ह्या दुर्लक्षित रहाणार्या नवोदितांना स्थान मिळवून त्यांची साहित्य जगतात वेगळी ओळख निर्माण करून देण्याच्या उद्देशाने नुकतीच "शब्द पखाली" संस्थेची स्थापना करण्यात आली. त्याची जिल्हानिहाय कार्यकारणी शब्द पखालीचे अध्यक्ष जयराम मोरे व सचिव अमोल पाटील यांनी जाहीर केली. शब्द पखालीच्या विविध जिल्ह्यांतून जिल्हाध्यक्ष म्हणून गुरुदत्त वाकदेकर (मुंबई), विशाल टर्ले (नाशिक), विशाल गेडाम (चंद्रपूर), प्रसाद महाले (धुळे), आदित्य गोमटे (जालना), शाहीर एस. एम. तांबेकर (कोल्हापूर), नवनाथ मोरे (पुणे), चक्रधर ठाकरे (नागपूर), विजय सूर्यवंशी (जळगाव), संदीप वाकडे (औरंगाबाद), अश्लेष माडे (गोंदिया), सोमनाथ गायकवाड (लातूर), प्रकाश फर्डे (ठाणे), अर्जुन देशमुख (हिंगोली) तसेच जिल्हासचिव म्हणून सतीश काथेपुरी (नाशिक), ऐश्वरी खामकर (ठाणे), लिना चौधरी (जळगाव), हणमंत जाधव (लातूर) आणि तालुकाध्यक्ष म्हणून आरती खैरे (चाळीसगाव), सचिन मौर्य (जळगाव), वृषाली मगरे (भुसावळ), चेतन चौधरी (यावल), कृष्णा तपोने (जामनेर), गायत्री बोढरे (अमळनेर), विशाल पाटील (एरंडोल), घनश्याम माळी (धरणगाव) यांची निवड करण्यात आली. साहित्यिकांसाठी एक आगळे वेगळे व्यासपीठ निर्माण करून अनेक प्रकारचे उपक्रम, कार्यक्रम तसेच स्पर्धा राबविल्या जाणार आहेत. शब्द पखालीतर्फे पहिले ऑनलाईन कविसंमेलन घेतले होते. त्यात ४० कवींनी सहभाग घेतला होता. कवींनी रसिकांची मनं जिंकत त्यांनी सगळ्यात वेगळी ओळख महाराष्ट्रात निर्माण केली आहे. "शब्द पखाली"चा हा प्रवास साहित्यिकांसाठी सुरु झाला आहे.
Post a Comment