तळा (किशोर पितळे)
कोरोना संसर्ग उपाय योजनांचा आढावा आणि विशेष सूचना देण्यासाठी आज शनिवारी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तहसील कार्यालयात आढावा घेवून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.यावेळी तहसीलदार श्री.कनशेट्टी,तळा पोलीस निरीक्षक श्री गेंगजे,गटविकास अधिकारी व्ही.व्ही.यादव नायब तहसीलदार खरोडे मंडल अधिकारी,तलाठी, तळा पोलीस निरीक्षक गेंगजे साहेब तळा नगरपंचायतीच्या सि.ई.ओ.माधुरी मडके तळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तळा बि.डी.ओ.यादव बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंदे उपस्थित होते.अधिकारी वर्गांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला यावेळी तळा प्रेस क्लब अध्यक्ष संजय रिकामे, किशोर पितळे,पुरुषोत्तम मुळे,श्रीकांत नांदगावकर आदि मान्यवर उपस्थित होते.
तळा तालुक्यात प्रशासनाच्या वतीने चांगले सहकार्य होत असुन दिवस रात्र यंत्रणा काम करीत आहे परंतु दुर्गम डोंगराळ भागात वसलेला तळा तालुक्यात असुविधा मोठ्याप्रमाणावरआहेत.संपुर्णतालुक्यासाठी तळा हे एकच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे याप्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत रोवळे,मांदाड,पीटसई,भानंग तळेगाव ही पाच उपकेंद्रे आहेत या संपुर्ण उपकेंद्रातुन व प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पद रिक्त आहेत ही पदे भरावी यासाठी पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली.कोरोना पाश्वभुमीवर तळा तालुक्यात तहसिलदार,पोलीस निरीक्षक,गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी खुप चांगल्या प्रकारे काम करत आहेत.तालुक्यात एकच वैद्यकीयअधिकारी असल्याने त्यांच्यावर ताण पडत आहे ते ही रात्रंदिवस सतरा अठरा तास काम करत असतात.आजआरोग्यखात्यात कर्मचारी उपलब्ध करुन आपण सर्वांनी त्यांना सहकार्य केले पाहीजे प्रशासन स्तरावर रिक्त जागा त्यांच्या सोयीनुसारभरल्या जातील परंतु यारोगाविरुद्ध लढण्यासाठी आपण तातडीने कर्मचारी उपलब्ध करुन द्यावेत या प्रकारचे निवेदन तळा तालुका प्रेस क्लब आणि मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.यावर निधी चौधरी यांनी सकारात्मक उत्तर देऊन कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.
तळा तालुक्यात एकही पाॅजेटीव्ह रुग्ण आढळलेला नाही याबाबतीत त्यांनी समाधान व्यक्त केले.ईतर ठिकाणी आढावा घेताना अनेकांनी प्रशासना विरुध्द तक्रारींचा पाढा वाचला परंतु आज तळा तालुक्यात अधिकारी आणिकर्मचारी चांगले काम करतअसल्याचे पत्रकारांकडुन सांगण्यात येत असल्याने त्यांनी विशेष करुन आरोग्य खात्याचे अभिनंदन केले.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन पत्रकारांकडे पाहीले जाते कोरोना संदर्भात सकारात्मक बातमी देऊन या रोगाविरोधात अधिकारीआणि कर्मचारीयांचेमनोबल वाढविण्यासाठी सहकार्य करण्याचे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले.
Post a Comment