तळा(किशोर पितळे)
सध्या जगभर वाढलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आपल्या देशामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये दिवसेंदिवस कोरोना ग्रस्त रुग्णाची वाढती संख्या लक्ष्यात घेऊन जे.जे. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर तातडीचे उपचार करण्यासाठी उदात्त भावनेतून लागणारी यंत्र सामुग्री व एक्सरे मशीन घेण्यासाठी २३लाख रुपये सुमन रमेश तुल्शियानी ट्रस्ट तर्फे देण्यात आले पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहाने वैद्यकीय संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे धनादेश सुपुर्द करण्यात आला. त्यावेळी जे जे हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ संजय सुरसे सर, तुल्सियानी ट्रस्ट तर्फे श्री मनीष रूपांनी श्री सुदेश शिर्के नाना पालकर स्मृती समितीचे व्यवस्थापक श्री कृष्णा महाडिक उपस्थित होते.या ट्रस्टने अनेक ठिकाणी सामाजिक बांंधिलकीचे
भान ठेवूनसुविधाउपलब्धकरूनदिल्याआहेत.त्यामध्ये रायगड जिल्हातील जि.प.उर्दु प्रार्थमीक शाळा तळा येथे सुलभ र्शौचालय,पाणी व्यवसाय,शालेय साहित्य वाटप,गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च हे ट्रस्ट नेहमी मदतीचा हातपुढे करीत असते.ट्रस्टने या कठीण काळात मदतीचा हात दिल्याने जे.जे.हाँस्पिटलचे अधिक्षक डॉ.सुरसे सर यांनी धन्यवाद दिले आहेत
Post a Comment