मुंबई प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंती निमित्ताने २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, अक्षरमुद्रा यू ट्यूब चॅनल आणि मराठी साहित्य व कला सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रित कवींचे ऑनलाईन काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. सदर कविसंमेलनात रविकिरण पराडकर, प्रमोदिनी देशमुख, मानसी नेवगी, कविता बालंखे, सलोनी बोरकर, गार्गी मयेकर, प्रज्ञा कांबळे, स्वाती शृंगारपुरे, दर्शना क्षीरसागर, हेमलता देशपांडे आदी मान्यवर आपल्या कवितांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट उलगडून दाखविणार आहेत.
सदर संमेलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर हे मार्गदर्शन करणार आहेत. स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपलब्ध होणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, अक्षर मुद्रा चॅनलचे संचालक डॉ. योगेश जोशी आणि मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक गुरुदत्त वाकदेकर यांनी केले आहे.
Post a Comment