संजय खांबेटे : प्रतिनिधी म्हसळा
म्हसळा तालुक्यातील नगरपंचायत हदीतील दुर्गवाडी गावातील ६० वर्षीय ईसमाचा स्वॅब कोरोना पाॅझीटिव्ह निघाल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले त्यामुळे शहरासह तालुक्यात घबराट उडाली आहे.तालुक्यातील ३९ ग्रामपंचायती व म्हसळा नगरपंचायतीतील म्हसळा शहरासह नगरपंचायत हद्दीतील गौळवाडी, दुर्गवाडी, चिराठी, सावर गौळवाडी ,बौध्द वाडी, या विविध वस्तींवर किमान १८०० ते २१०० चाकरमानी मुंबई वरून आले आहेत, त्यामध्ये मुंबईतील बोरीवली येथील हॉटस्पॉट वस्तीतून आलेला दुर्गवाडी गावातील कॉरंटाईन असलेल्या ६० वर्षीय ईसमाचा दि १९ मे रोजी अचानक श्वसनाचे त्रासाने मृत्यू झाल्याने आरोग्य व नगर पंचायत प्रसासनाने मृत्यू पश्चात स्वॅब घेऊन नवी मुंबईत तपासणीसाठी पाठविला असता कोरोना पाॅझीटिव्ह निघाल्याने म्हसळा करांचे मनात घबराट झाली.
दुर्गवाडी येथील ६० वर्षीय वृद्ध झसम दिं १६ मे रोजी बोरीवली येथील हॉटस्पॉट वस्तीतून मुलगा, मुलगी व जावई यांच्या समवेत म्हसळा शहरांत आला,मुलगी व जावई त्यांच्या चिरगाव या गावी गेले, मयत इसम व मुलगा रिक्षाने दुर्गवाडी येथे आले नंतर २ते ३ दिवसात दुर्गवाडी येथे श्वसनाचे त्रासाने वृद्धाचा मृत्यू झाला. मृतदेहावर ठरवून दिलेल्या कार्यपद्धती प्रमाणे नगरपंचायत प्रशासनाने अंत्यसंस्कार केला. या प्रकारांत मुलगा, मुलगी,जावई व संबंधीत रिक्षाचालकाला प्रशासन कॉरंटाईन करणार आसल्याचे समजते. अद्यापपर्यंत शासनाने केवळ सुमारे ३०० ते ३५० वस्तीचे दुर्गवाडी क्षेत्र अगर मृत व्यक्तीचे घराभोवतीचे क्षेत्र Containment Zone(करोना विषाणू बाधित क्षेत्र) प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केले नाही.
Post a Comment