कोरोना असून ही अंगणी वाळवंणानी सजली.महीला वर्ग आघोटीच्या कामात व्यस्त.



तळा (किशोर पितळे)
उन्हाळा हा ऋतू जरा त्रासदायक वाटत असला तरी भारतीय खाद्य संस्कृतीत त्याची मदत मोठी आहे.लग्न सराई असताना देखील महिला या कामाला अधिक लक्ष देत असतात.यावेळेची आघोट कोरोनामुळे लाँकडाऊन व संचारबंदी असूनही महिला वर्ग मात्र या कामात व्यस्त आहेत. ग्रामीण भागातील महिला शेतीची कामे करून याकामाकडे गुंतल्या आहे.त्यांना जोड मिळाली आहे ती शहरातून गावाकडे आलेल्या महीला वर्गाची त्यामुळे कामाला वेग आला आहे.शाकाहारी वर्गातील महिलाअघोटीचे पदार्थ बनवून त्याची बेगमी करणाऱ्या महिलांची लगबग हे उन्हाळ्याचे वैशिष्ट्य आहे पापड, कुरकुरीत कुरडया,सांडगे,फेण्या,लज्जतदार मसाले,पदार्थ,हळद, आंबोशी,कडधान्यहे सर्व पदार्थयाकाळात हवा बंद किंवाबरणीबंद होत असतात.तसेचउपवासाचे बटाटा पापड, साबुदाणा चिकोडी, बटाटा वेफर्स, फणसाचे, आंब्याचे साठे हे देखील जास्त प्रमाणात कोकण किनारपट्टीतील महिला अधिक प्रमाणात हे खाद्य पदार्थ साठवणूक करीत असतात तर महिला व्यवसायीक अधिक प्रमाणावर सक्रीय असतात. वाळवंण संस्कृती हि पारंपरिक पद्धतीने चालत आली आहे.प्रांताप्रांतानुसार ते पदार्थ महीला शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक प्रमाणात करीत असताना पहायला मिळत आहे.विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत खाद्यपदार्थ हीकमीनाहीत.उन्हाळी पदार्थ म्हणजे एक सामुदायिक कार्य असायचे. एकमेकींच्या मदतीने हे खाद्य पदार्थ घालायच्या पुरूष मंडळी आँफिसला किंवा इतर धंदा उद्योगाला गेल्यावर नी परत येईपर्यंत ही अँक्टीव्हीटी पुर्ण होत असे तसेच शाळेला सुट्टी असल्याने त्या कामात मुलांचा हातभार लागत आहे . तसेच सर्वात महत्त्वाची भूमिका म्हणजे आजीबाईचे काम सुपरव्हिजन व मार्गदर्शन करणे . त्यामुळे सून, नातवंडे,जाणत्या मुलींना या वाळवणाची संस्कृती माहेराहून सासरी घेऊन जाण्यासाठीमहत्त्वाचे ठरले जातआहे.ग्रामीणभागातील मांसाहारी वर्ग, विषेशतःकिनारपट्टीतील महिला सोडे,सुकट,बोंबील, करंदी, जवळा,खारेमासे सुकवून किमान सहा महिन्यासाठी पुरेल  इतका करून ठेवीत आहेत.असे चित्र सर्वत्र पहायला दिसत असून महीला वर्ग या आघोटीच्या कामात व्यस्त दिसत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा