कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ग्रामिण रुग्णालय, प्रा.आरोग्य केंद्र आणी उपचार केंद्राबाबत शासन सक्रीय


कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ग्रामिण रुग्णालय, प्रा.आरोग्य केंद्र आणी उपचार केंद्राबाबत शासन सक्रीय ; रायगड जिल्हा पालक मंत्री आदीती ताई तटकरे यांची महत्वाची भूमिका.

संजय खांबेटे :  प्रतिनिधी म्हसळा
जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना+ रुग्णांची संख्या वाढत असतानाच प्रशासन अतिशय सकारात्मक पाऊल उचलत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्याच्या पालक मंत्री आदीती ताई तटकरे यांसुद्धा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून याच विषयानी दौरे व आभ्यास करीत आहेत.म्हसळा तालुक्यात अद्याप पर्यंत कोरोना+ रुग्ण सापडला नसल्याने सकृत दर्शनी त्या विषयी सर्वसामान्याना गांभीर्य दिसत नसले तरी करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे जिल्ह्यांत बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. पालकमंत्री आदीती ताई तटकरे व जिल्हा प्रशासन विशेष सर्तक आहे. 
त्या दृष्टीकोनातून पालकमंत्र्यांनी म्हसळा ग्रामिण रुग्णालयाला स्वॅब सॅम्पल तपासणी बूथ (स्वॅब टेस्टिंग क्यूब) व अन्य साहीत्य प्राधान्याने दिलआहे. संबंधीताना प्रशिक्षण दिले आहे.जिल्ह्यात कोविड-19 रुग्णालये (Dedicated Covid Hospital), कोविड आरोग्य केंद्रे (Dedicated Covid Health Centre) आणि कोविड उपचार केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. म्हसळा तालुक्यात सुध्दा कोविड स्क्रिनिंग सेंटर म्हसळा प्रा. शाळा नं १ मध्ये ,कोविड केअर सेंटर ग्रामिण रुग्णालयांत ,विलगीकरण केंद्र ITI आगरवाडा व पर्यायी स्वरूपांत अल अहमद हॉस्पीटल मध्ये सुरु करण्याचे नियोजित आहे. या सर्व सुविधा सुरू करण्यासाठी पालकमंत्री आदीती ताई तटकरे व जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्नशील असताना तालुक्यात आरोग्य व्यवस्थापन यंत्रणेत पाहीजे तसा समन्वय नसल्याने गती येत नसल्याचे दिसत आहे.
फोटो : ग्रामिण रुग्णालयात होणार असणारे कोवीड सेंटर

आरोग्य यंत्रणेतील त्रुटी
१ ) ग्रामिण रुग्णालयात एका कक्षात प्रा.आ.केंद्राची अस्थापना कार्यरत आहे ती नियोजनात ( पं.स. व जि.प. ठरावानुसार तात्काळ पाभरे येथे स्थलांतरीत व्हावे,पाभरे येथील जि.प. दवाखाना पांगलोली येथे तातडीने स्थलांतरीत होणे जरुरीचे आहे).जेणेकरून ग्रामिण रुग्णालयांत कक्ष स्थापनेला जागा रिक्त होईल)
२)ग्रामिण रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षक,औषध निर्माण अधिकारी ,अधिपरिचारिका वर्ग३ची ७ पदे, स्वच्छक १५ ही पदे तात्काळ भरणे आवश्यक आहे.
३ )रुग्णालया साठी व्हेंटीलेटर, एक्स रे मशीन, A.C, ऑक्सिजन री जनरेटर, निर्जुतुकीकरण मशीन या गोष्टी प्राधान्याने गरजेच्या आहेत.
४ ) पीपीई कीट,N.95 मास्क, फेस शील्ड, सॅनीटी लायझर, डेटॉल व Cleaning Materials, हॉस्पीटल फर्नीचर.
५ )विलगीकरण केंद्र ITI आगरवाडा येथे नियोजित आहे.परंतु अपुरा पाणी पुरवठा ,स्वच्छता गृहांची कमतरता,ITI ची गळकी इमारत या समस्या आहेत.


ग्रामिण रुग्णालय मे २०१४ ला सुरु झाले, आज तब्बल ६ वर्ष झाली असल्यामुळे प्रा.आ.केंद्र पाभरे येथे,पाभरे येथील जि.प. दवाखाना खाडीपट्टयांतील पांगलोली येथे व ग्रामिण रुग्णाल यात आवश्यकती तांत्रिक पदे,अधिक्षक व स्टाफ मिळणे आवश्यक आहे.
अशोक काते , पत्रकार वसामाजिक कार्यकर्ता.


फोटो  : ग्रामिण रुग्णालयात आलेले स्वॅब बूथ

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा