संजय खांबेटे : म्हसळा -प्रातिनिधी
म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा येथील रामचंद्र रामजी पाडावे वय वर्षे 60 याने राहते घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक ४ मे २०२० रोजी सकाळी 8 ते 10.30 वाजताचे दरम्यान घडली. सदर घटनेची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात मयताची पत्नी मुक्ता रामचंद्र पाडावे हिने दिले वरून पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नं.७/२०२०सिआरपीसी 174 प्रमाणे केली आहे.घटनेची माहिती घेतली असता मयत रामचंद्र याचे वर्षभरापुर्वी कमरेवर ऑपरेशन करून आजारावर उपचार करण्यात आले होते परंतु पुन्हा त्याच ठिकाणी गाठ आल्याने त्यास कंटाळुन रामचंद्र पाडावे याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादी मध्ये नमुद करण्यात आले आहे.घटनेचा अधिक तपास सपोनी धनंजय पोरे यांचे मार्गदर्शनाने पोलीस नाईक कैलास होडशील हे करीत आहेत.
Post a Comment