म्हसळा नगरपंचायत कर वसुलीच्या पावित्र्यात : आर्थिक टंचाईचे नगरपंचायतीवर सावट



संजय खांबेटे :  म्हसळा प्रातिनिधी
म्हसळा नगरपंचायतीचा नागरिकांवर फार मोठा थकीत कर असून तो कर वसूल करण्यासाठी म्हसळा नगरपंचायत नगर परिषदा नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९५६ अन्वये वसुलीसाठी जप्तीची कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे असे मुख्याधिकारी मनोज उर्कीडें यानी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सन २०१९-२० च्या आर्थिक वर्षात विविध करांची वसुली अत्यल्प झाल्यामुळे , वाढती पाणी टंचाई व त्यावरील टँकर, बोअरींग,पंप बसविणे व सोयी सुविधांवरील वाढता खर्च, कोव्हीड (१९) त्या अनुषंगाने संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करणे व अन्य उपाययोजना जनजागृती यावर मोठ्या प्रमाणात होणारा आत्यावश्यक खर्चाने नगरपंचायत आर्थिक संकटात आली आहे त्यामुळे थकित पाणीपट्टी, घरपट्टी सक्तीची वसुली हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून लौकरच त्या बाबत संबधीताना कायदेशीर नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे मुख्या धिकारी मनोज उर्कीडें यानी सांगितले.

"शहरातील अनेक भागात ( नवे नगर, पंचायत समिती, सार्वजनिक वाचनालय परिसर व अन्य काही भागात ) तिव्र पाणी टंचाई सदृश्य परिस्थीती आहे, टंचाई ग्रस्त भागाला पाणी पुरवठा करणे नगरपंचायतीचे कर्तव्य आहे. यासाठी वसुलीवर भर देण्यात येणार आहे शहरातील ८१ व्यंक्तीकडे ५ वर्षाची वसुली शिल्लक आहे , आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी हा पर्याय आहे"
-मनोज विष्णूपंत उर्कीडे मुख्याधिकारी, नगरपंचायत म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा