बोर्लीपंचतन परीसरात यापुर्वीच्या निर्बंधासह टाळेबंदीत शिथीलता ; ऑरेंज चा ग्रीन झोन करण्याची जबाबदारी नागरीकांची - API महेंद्र शेलार


मकरंद जाधव-बोर्लीपंचतन
टाळेबंदी शिथिल करण्याबाबत केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.त्या प्रसिद्ध करताना राज्य सरकारने स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात टाळेबंदीच्या काळात कोठे शिथिलता देता येईल,नेमके कोणते उद्योग-व्यवसाय सुरू करता येतील,याचा आढावा घेण्यास राज्य सरकारने सुरवात केली आहे. 
राज्य सरकारने आदेश दिल्यावर जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतील,असेही केंद्राने स्पष्ट केले त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड यांनी टाळेबंदी शिथीलतेबाबत काढलेल्या आदेशानुसार श्रीवर्धन तालुका प्रशासनाने बुधवार दि. ६ मे रोजी बोर्लीपंचतन येथील डॉ.ए.आर.उंड्रे हायस्कुल मध्ये पंचक्रोशीतील सरपंच,पोलीस पाटील,प्रतिष्ठित नागरीक व व्यापारी अशा मोजक्या लोकांना आमंत्रित करुन व सामाजिक अंतराचे कसोशीने पालन करुन मा.तलहसीलदार सचिन गोसावी व दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.महेंद्र शेलार यांनी शासन व प्रशासनाकडुन प्राप्त झालेल्या आदेशानुसार उपस्थितांना आपल्या विभागातील टाळेबंदी शिथिलतेबाबत मार्गदर्शन केले जिल्हाधिकारी रायगड यांनी तालुका प्रशासनाला दिलेल्या आदेशानुसार बोर्ली पंचक्रोशीतील काही व्यावसायिकांना अत्यावश्यक, जीवनावश्यक व काही आवश्यक व्यवसायांना सामाजिक अंतराचे पालन करुन व्यवसाय करण्यास शिथिलता देण्यात येत आहे.तसेच तोंडावर आलेला पावसाळा त्यामुळे काही मान्सुनपुर्व अपुर्ण राहीलेली कामे पुर्ण करण्यासाठी शिथीलता देण्यात येत आहे.त्याचबरोबर मुंबई व पुण्यासारख्या शहरातुन गावी येणारे आपले नातेवाईक हे ज्या घरी येतील त्या घरातील सर्व सदस्यांसह त्यांना २८ दिवस सक्तिचे क्वारंटाईन करण्यात येईल जे कोणी व्यक्ती गावामध्ये येतील व ते लपविण्याचा प्रयत्न करतील त्याची माहीती गावातील सरपंच,पोलीस पाटील व जबाबदार नागरीक यांनी त्वरीत प्रशासनाला कळवुन आपल्या गावाचे व पर्यायाने देशाचे आरोग्य सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी.असे आवाहन तहसीलदार श्री.सचिन गोसावी यांनी उपस्थितांना केले.
  श्रीवर्धन तालुका प्रशासनाचे उत्तम नियोजन व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेउन आपल्या विभागात कोरोना संसर्ग वाढणार नाही याची घेतलेली दक्षता त्यामुळे पुढील धोका टळला.आपला जिल्हा हा अॉरेंज झोनमधुन ग्रीन झोनमध्ये  नेण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरीकाची आहे.आपल्या विभागाला काही आवश्यकतेनुसार टाळेबंदीतुन दिलेले शिथीलतेचे स्वातंत्र्य हे यापुर्वी असलेल्या निर्बंधासह आहे याची जाणिव ठेउनच प्रत्येक जबाबदार नागकांनी आपली कामे करावयाची आहेत.असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.महेंद्र शेलार यांनी केले.
   या शिथीलतेमुळे लघुउद्योजक, शेतकरी कष्टकरी,गोर-गरीब त्याचप्रमाणे हातावर पोट असलेल्यांना थोडाफार दिलासा मिळणार आहे.
यावेळी गट विकास अधिकारी प्रविण सीनारे,आरोग्य अधिकारी सुरज तडवी व अश्विनी खैरनार मंडळ अधिकारी सुनील मोरे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा