संजय खांबेटे : म्हसळा प्रातिनिधी
कोव्हिड १९ च्या अनुषंगाने "लॉक डाऊन ३" मध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जिवनावश्यक वस्तूची दुकाने म्हणने सर्व किराणा, औषध, दूध,डेअरी व्यवसाय सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू रहाणार आसल्याचे सुधारीत आदेश काढण्यात आले आहेत त्याच प्रमाणे म्हसळा शहरातील किराणा, औषध, दूध,डेअरी व्यवसाय सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू रहाणार आहेत. त्या अनुषंगाने राज्य शासनाने दंड प्रक्रिया संहीता१९७३चे कलम १४४ खालील तरतुदीनुसार जमावबंदी आदेश लागू केला आहे, त्यानुसार ५ किंवा पाच पेक्षा जास्त नागरिकानी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे किराणा, औषध, दूध,डेअरी व्यवसाय करताना Social Distancing चे किमान अंतर ३ फूट हा नियम व मास्क आवश्यक रहाणार आहे, मास्क न वापरणाऱ्यांवर प्रतिव्यक्ती रु ५००, दुकाना समोर सामाजीक अंतर (Social Distancing) नसल्यास दुकानदाराला रू१००० व ग्राहकाला रु २०० दंड आकारण्यात येणार आसल्याचे प्रसिद्धी पत्रक नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उर्कीडे यानी दिले आहे. या नियमांचे पालन करण्यासाठी लिपिक संतोष भिकू कुडेकर यांची नेमणूक केल्याचे उर्कीडे यानी कळविले आहे.
"कोरोना विषाणू अनुषंगाने मागील दोनही लॉक डाऊन मध्ये सर्व व्यापाऱ्यानी शासनाला सहकार्य केले होते, शासनाने ग्राहकांसाठी खरेदीची वेळ वाढविल्याची ग्राहकाना माहीती समजल्यावर भविष्यांत गर्दी कमी होईल."
व्यापारी प्रातिनिधी
Post a Comment