संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
कोवीड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यासंदर्भात राज्य शासनाने त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकाऱ्यानी परिपत्रक काढले आहे.राज्यातील कोवीड विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत असताना हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची दुकाने सुरू करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात म्हसळा शहरांत दुकानदार,स्थानिक प्रशासन व नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था मोठया प्रमाणात दिसत आसल्याची तक्रार शिवसेना ता. प्रमुख महादेव पाटील यांची आहे. जिल्हाधिकारी यानी काठलेल्या परिपत्रकात स्पष्टता असताना ऐकमेका कडे बोट दाखवून प्रशासनाने वेळ काढू पणा करू नका अशी पाटील यांची तालुका प्रशासनाकडे मागणी आहे.तालुका महसुल, नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने निर्देशीत केलेल्या अधिसूचनेचे पालन व्हावे हे संकेत असताना, अत्यावश्यक सेवेतील बाजारपेठ सर्वसाधारणपणे सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत उघडी असावी त्यामध्ये सर्व किराणा, औषध, दूध, डेअरी व मेडीकल व्यवसाय सुरू रहाणार आहेत.म्हसळा शहरांत मात्र याचे पालन होत नसल्याने व्यापारी व ग्राहकांत संभ्रमावस्था आहे.
मान्सून पूर्व पुढील कामासाठी आहे शिथीलता
इमारतीचे सरक्षण, शटरींग, वॉटरप्रूफींग, स्ट्रक्चरल रिपेअर्स, धोकादायक इमारती पाडण्याची कामे, सीमेंट,लोखंड, RMC Plant, डांबर व खडी निर्मिती करणारे फ्लँट, हार्डवेअर व अन्य.
"म्हसळा बाजारपेठ ही लालुक्यातील ११० गावे वाडयांसाठी मध्यवर्ती बाजारपेठ आहे. म्हसळ्याच्या आठवडा बाजाराची परंपरा तब्बल १८५ वर्षाची आहे. यामध्ये प्रामुख्याने सुकी मच्छी, कडधान्य, मिरची , ओली मच्छी विकली जाते, आठवडा बाजाराची समृद्ध परंपरा जपण्यासाठी नगर पंचायतीने बंद असलेल्या विविध शाळांची पटांगणे वापरुन तिथे विवक्षीत मालासाठी विक्री व्यवस्था करून आठवडा बाजारायी परंपरा चालू ठेवणे शेतमाल विक्रीसाठी पूरक ठरेल.
अनंत नाक्ती, सरपंच ग्रामपंचायत (बु)
"आत्ता पर्यंत दोन लॉक डाऊन यशस्वी करणाऱ्या प्रशासनाला सुप्त पध्दतीने नागरिक, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी,व्यापारी संघटना, पत्रकार यांचा पाठींबाच आहे.काेविड-19 चे संकट हे वैयक्तीक नसून राष्ट्रीय संकट आहे याची आम्हा सर्वाना जाणिव आहे प्रशासनाने या संर्वाची जाणिव ठेवावी. सर्व प्रशासकीय यंत्रणेचा समन्वय आसावा"
महादेव पाटील, तालुका प्रमुख , शिवसेना म्हसळा.
Post a Comment