म्हसळ्यात कोरोनाचा कहर सुरू


म्हसळ्यात कोरोनाचा कहर सुरू: वारळ येथील मृत महिला,ठाकरोली येथील एकला कोरोनाची लागण:कोरोना बाधित रुग्णाची संख्या ६ वर 

म्हसळा(निकेश कोकचा)

म्हसळ्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला असून तालुक्यात दोन नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे.कोरोना बाधित झालेले हे रुग्ण देखील मुंबई येथून आपल्या राहत्या गावात आले होते.
तालुक्यातील वारळ येथे 17 मे रोजी मुंबई नेरूळ येथून आलेल्या एक महिलेचा २५ मे रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता.या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.मृत महिलेच्या नातेवाइकांनी या महिलेला या दरम्यान एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेहले असल्याचे स्पष्ट झाले असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.दूसरा कोरोना बाधित रुग्ण हा १७ मे रोजी ठाणे येथून आपल्या पत्नी सोबत म्हसळा तालुक्यातील ठाकरोळी या गावात आला आहे.हा रुग्ण पोटात दुखते, संपुर्ण अंग दुखते असल्याचा संशयावरून आपल्या गावात आल्या नंतर २२ मे रोजी पत्नीसोबत  कावीळ उतरवण्यासाठी तालुक्यातील गोंडघर येथे गेला होता.वरील दोन्ही रुग्णाचा अहवाल अनुक्रमे बुधवारी व गुरवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.या दोन्ही जंनांसहित म्हसळा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाचा आकडा ६ झाला असून यात दोन मृत झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा