म्हसळा तालुका प्राथमिक शिक्षक वृंद यांचे वतीने रक्तदान शिबीर संपन्न.


म्हसळा : सुशील यादव
       कोरोना 19 चे अनुषंगाने म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे वतीने  दि 27/5/2020 रोजी तालुका शाळा  म्हसळा येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. तालुक्यातील एकूण 63 रक्तदात्यांनी रक्तदान केले.   उपस्थिती- रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती  बबन मनवे, पंचायत समिती  उपसभापती  मधुकर गायकर,नगराध्यक्षा  जयश्री कापरे ,तहसीलदार  तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी,गटविकास अधिकारी  वाय.एस.प्रभे, सहा.गटविकास अधिकारी   प्रदिप डोलारे, गटशिक्षणाधिकारी  संतोष शेडगे, म्हसळा तालुका राष्ट्रवादी पक्षाचे  अध्यक्ष  समीर बनकर, शिवसेना तालुका प्रमुख  महादेवराव पाटील,युवासेना तालुका प्रमुख  अमित म्हामुणकर , संतोष सावंत ,पत्रकार  उदय कळस,गटसमन्वयक गजानन साळुंखे, विशेष आतिथी रविंद्र पाटील सर व अनिल नाचपल्ले सर यांनी उपस्थित राहून तसेच पंचायत समिती  सभापती उज्वलाताई सावंत,सदस्य   छायाताई म्हात्रे,  संदिपजी चाचले यांनी फोन संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या व  आपला देश कोरोना चे संकटाशी सामना करत असताना म्हसळा तालुक्यातील शिक्षकांनी हे रक्तदान  शिबीर आयोजित करून चांगला आदर्श  घडविला याबद्दल  आयोजकांना धन्यवाद दिले.  
           सदरचे शिबीर  यशस्वी करण्यासाठी  नरेश सावंत,  किशोर मोहिते, सुनिल पवार,  आण्णासाहेब बिचुकले, रमेश जाधव ,राजेंद्र मालुसरे, राजेश खटके,विजय घाटगे ,शुभदा दातार ,प्रकाश कोठावले राहुल नाईक ,  सुमित्रा खेडेकर, पनीता गावीत, वंदना खोत,संभाजी जळकोटे,जितेंद्र महाले तसेच शाळा व्यवस्थापन समिती   यांनी सहकार्य केले, शाळा  व शाळेचा परीसर नगरपंचायतने निर्जंतुकीकरण करून दिले याबद्दल तसेच   शिबिरासाठी लागणारे मास्क व सॅनिटायझर मांदाटणे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत पवार यांनी पुरविले बद्दल व सर्व रक्तदात्यांचे आयोजकांनी आभार  मानले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा