संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून म्हसळाकर घामाच्या धारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची गेले दोन दिवस सुरवात संधीप्रकाशाचे सुर्योदयाने व पावसाच्या शिडकाव्याने होत आहे त्यामुळे सुरवात छान होते. परंतु दिवसभर मान्सून पूर्व शेती कामात , आंबा काढणीत पुरती दमछाक होत आसल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान तालुक्यात आंबा पिकाखाली १८७९ हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी बहुतांश क्षेत्रावरील आंबा पिकाची काढणी झाली असावी असा दावा कृषी विभागाचा आहे. ऐन आंबा काढणीच्या हंगामात म्हणजे मार्च अखेर पासून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉक डाऊन मधील कुशल मजुरांचा अभावामुळे काढणी गतीमान न झाल्यामुळे किमान १५ते २० % फळ काढणी अद्यापही झाली नसल्याचे तालुक्यातील बागायत दारांचे म्हणणे आहे.
" तालुक्यात एप्रिल महिन्यापासून आंबा पिक तयार होते परंतु त्याच दरम्यान लॉक डाऊन १ ते ४ होते, ग्रामिण मजुरांचे मनांतील कोरोना बाबत समज गैर समज बाबत यामुळे . सुरवातीला फळ काढण्याची प्रक्रिया मंदावली होती , त्याचा फळ काढणीवर परिणाम झाला आहे"
रशीद फकीह, आंबा बागायत व निर्यातदार.
"आठवड्यात मान्सूनपूर्व सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 1 जूनला केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. 8 जूनला राज्याच्या दक्षिण भागात मान्सून प्रवेश करेल आणि 16 तारखेपर्यंत उत्तर भाग व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे"
हवामान विभाग
Post a Comment