उमरठच्या विकासाचा कृती आराखडा तयार करणार ; विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणी मान्य
मुंबई : पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मभूमी स्थळाच्या विकासासाठी पाच कोटींची तरतूद करण्याची घोषणा अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी रात्री विधान परिषदेत केली. तसेच उमरठच्या विकासाचा कृती आराखडा तयार करण्याचे आश्वासनही देसाई यांनी दिले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या जन्मभूमी स्थळाच्या विकासासठी आग्रही भूमिका घेतली होती.
अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थराज्यमंत्री नाईक बोलत होते. अर्थसंकल्पावरील चर्चेतील उत्तरात राज्यमंत्र्यांनी केवळ महाविकास आघाडीतील नेत्यांशी संदर्भातील कामांची दखल घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला होता. तसेच स्वत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उमरठच्या विकासासाठी मागाल ते सर्व देण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले होते. प्रत्यक्षात त्यासाठी कोणतीच घोषणा केली नाही. किमान मुख्यमंत्री जी आश्वासने देतात त्याची तरी नोंद ठेवा, असा टोला दरेकरांनी मारला होता.
नरवीर तानाजी मालुसरे जन्मस्थळ विकासाचा कृती आराखडा निश्चित करण्योच आश्वासन देतानाच अर्थराज्य मंत्री देसाई यांनी सांगितले की, सध्या जन्मस्थळासाठी पाच कोटींची तरतूद करु.
Post a Comment