प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षायोजनेंतर्गत अंत्योदय अन्नयोजना (AAY) व प्राधान्य कुटूंबयोजना (PHH) मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व शिधापत्रिकाधारकांचे RCMS प्रणालीद्वारे Digitalisation करुन आधार सिडिंग केले आहे. Aepds प्रणालीद्वारे RCMS मध्ये आधार सिडिंग झालेल्या सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना आधार प्रमाणित करुन ऑनलाईन पद्धतीने शासन नियमानुसार दरमहा अन्नधान्य वितरीत करण्यात येते.
केंद्र शासनाने एक देश एक शिधापत्रिका (One Nation One Card) अशी संकल्पना घोषित केलेली आहे. राज्य शासनाने या संकल्पनाची यापूर्वीच सुरुवात केलेली आहे. संपूर्ण राज्यात एक शिधापत्रिका असून महाराष्ट्रातील कोणताही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा पात्र शिधापत्रिकाधारक Aepds प्रणालीद्वारे त्याच्या शिधापत्रिकेचे माहितीसह आधार सिडिंग करुन घेतले असल्यास त्यास पोर्टेबिलिटीद्वारे कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही रास्तभाव धान्य दुकानातून आधार प्रमाणिकरण करुन शासन नियमानुसार अन्नधान्य प्राप्त करुन घेऊ शकतो.
कोविड 19 च्या प्रादूर्भावामुळे सध्या मुंबई, ठाणे, पुणे व इतर जिल्ह्यातील बरीचशी कुटुंबे रायगड जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित झाली आहेत. त्यांचा अन्नधान्याचा प्रश्न उद्भवला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या शिधापत्रिकेच्या संपूर्ण माहितीसह Aepds प्रणालीवर आधार सिडींग करुन प्रमाणिकरण केल्यास त्यांना पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे जिल्ह्यातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून ई-पॉस मशिनवर आधार प्रमाणिकरण करुन शासन नियमानुसार दरमहा अन्नधान्य प्राप्त करुन घेता येईल. पोर्टेबिलिटी सुविधेमुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा स्थलांतरीत शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून कोणत्याही परिस्थितीत वंचित राहणार नाही.
कोविड 19 च्या प्रादूर्भावामुळे जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक सध्या मुंबई, ठाणे, पुणे व इतर जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यामध्ये तात्पुरते स्थलांतरीत झाले असतील व त्यांनी Aepds प्रणालीवर आधारसिडींग केले असेल, त्या सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी पोर्टेबिलिटी सुविधेचा वापर करुन ई-पॉस मशिनद्वारे ऑनलाईन पद्धतीने शासन नियमानुसार अन्नधान्य प्राप्त करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी व जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी केले आहे.
Post a Comment