मुंबई प्रतींनिधी
प्रज्ञेश असोसिएशन, तळेगाव दाभाडे, पुणे व आनंदी काव्य मंच, मुंबई आयोजित अवांतर वाचन स्पर्धेची सुरवात व. पु. काळे लिखित पार्टनर या पुस्तकाने करण्यात आली. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून पुस्तक ध्वनीमुद्रण स्वरूपात स्पर्धकांना उपलब्ध करून देण्यात आलं. त्यावर आॅनलाईन प्रश्नोत्तर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे आॅनलाईन बक्षीस वितरण करण्यात आले. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव मा. संतोषजी खांडगे उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक संगिता क्षिरसागर, विजया दांगट, किशोर झोटे, अमिना मुलाणी, संकेत गुजरे, व्दितीय क्रमांक कल्पना गाडे, आशा लबडे, सविता काळे, तृतीय क्रमांक दिपाली लोखंडे, भारती भोसले, बापुराव पवार यांनी मिळविला. या स्पर्धेचे आयोजन दर आठवड्याला केले जाणार आहे. प्रज्ञेश असोसिएशन अध्यक्षा ज्योती दुर्गे- भेगडे, सचिव सतिश भेगडे, आनंदी काव्य मंच, मुंबईचे संस्थापक गुरुदत्त वाकदेकर, अध्यक्षा विद्या सरमळकर तसेच स्पर्धा समितीतील छाया गाडे, विजया दांगट, कल्पना गाडे, नमिता आफळे यांच्याद्वारे करण्यात येते. बक्षीस समारंभाचे सुत्रसंचलन छाया गाडे तर आभारप्रदर्शन कल्पना गाडे यांनी केले.
Post a Comment