तळा (किशोर पितळे)
शासनाने परप्रांतीय मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी व्यवस्था केली असुन, टप्प्याटप्प्याने या मजुरांना आपल्या राज्याकडे सोडले जात आहे. यातील काही रेल्वेने जात आहेत, तर काहींना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बसने सोडले जात आहे.अशाच प्रकारे तळा तालुक्यातुन कर्नाटक राज्यात ४४, मजुरांना रविवारी (दि.१७)सकाळी ९च्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने रवाना करण्यात आले. तळ्यातुन हजारो परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्यासाठी उत्सुक होते ऑनलाईन अर्ज या मजुरांनी शासनाकडे जमा केल्यानंतर गेल्या रविवारी (दि.१०) ९मजूर मध्यप्रदेशला व शनिवारी (दि.१६) १४ मजुर राजस्थानला रेल्वेने रवाना करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा रविवारी कर्नाटकसाठी ४४ मजूर रवाना झाले आहेत. कर्नाटक राज्यातील मजुरांसाठी दोन बस,आरक्षित करण्यात आल्या होत्या. तळा तालुक्यात व्यवसाय निमित्तानेनोकरीच्या निमित्ताने परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने आहेत. यासह तालुक्यात बांधकाम व्यवसायातही मजूर आहेत. या सगळ्यांचे काम सुरळीत चालू असताना कोरोना संकट आले. देशात व राज्यात याचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे मोल मजुरी बंद झाली. परिणामी कामासाठी परप्रांतातून आलेल्या मजुरांचा रोजगार बुडाला अणि उदरनिर्वाहाचा प्रश्न पुढे आला. काम बंद झाल्याने परप्रांतिय कामगारांना आपल्या गावाची ओढ लागली होती,परंतु प्रवासाची सर्व वाहने विशेषत: सार्वजनिक रेल्वे व बस बंद झाल्याने काही कामगारांनी पायीच मोर्चा आपल्या गावाकडे वळवला, मात्र ही मोठी मजल कशी मारायची हा प्रश्न असताना शासनाने यामजुरांना गावीजाण्यासाठी परवानगी दिली. मजुरांना गावी जाण्यासाठी रेल्वे खाते व राज्य परिवहन मंडळ पुढे आले.यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याच्या सुचना दिल्यानंतर तळा तालुक्यात ३५० च्या आसपास अर्ज दाखल झाले असून, अजून काही मजूर आपल्या गावी जाण्यासाठी अर्ज करीत आहेत.सर्व अर्जांची छाननी करुन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शकसूचनांनुसार रविवारीसकाळी ९च्या सुमारास तळ्यातुन कर्नाटक राज्यातील ४४ मजुरांना एसटी बसने रवाना करण्यात आले. कर्नाटक राज्यातील मजुरांसाठी दोन बस मजुरांना घेऊन रवाना झाल्या. या वेळी प्रत्येक मजुराच्या चेहर्यावर आपल्या गावी जाऊन आप्तेष्टांना भेटणार असल्याने आनंद दिसून आला.प्रत्येक मजुराला पाणी बॉटल, बिस्किट, खाण्याचे साहित्य आदी आवश्यक वस्तू व पदार्थ देण्यात आले. यावेळी तळा तहसिलदारतथा आपत्ती व्यवस्थापन समीती प्रमुख श्री अण्णापा कनशेट्टी नायब तहसीलदार श्री.परमेश्वर खरोडे पत्रकार संजय रिकामे आदि मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment