कोरोना व संचारबंदीमुळे बळीराजाचा मान्सूनपूर्व शेती मशागतीच्या कामाला वेग.


तळा(किशोर पितळे)संपूर्ण जगात कोरोना महामारी रोगाने जग हादरला आहे. लाँकडाऊन व संचारबंदी असून भविष्याची चिंता सर्वांना पडली आहेच.त्यामुळे सर्व सामान्य जनतेला देखील सुटलेली नाही. मुंबईकर मंडळी कोरोनामुळे धाबरून गावाकडे आली आहेत त्याचा फायदा शेतकरी कुटुंब घेत आहेत. लाँकडाऊन मुळे कोणाकडे जाणे येणे बंद झाल्याने तळा तालुक्यातील बळीराजा आपल्या शेतात मान्सून पूर्व शेती मशागतीच्या कामाला सुरुवात केली असून यंदा मान्सून लवकर येण्याची चिन्हे दिसू लागली असल्याने लग्नसराई मंदावली असून मशागतीला रणरणत्या उन्हात वेग घेतला असल्याचे दिसून येत आहे. नदी, धरणाच्या पाण्यावर असणारी उन्हाळी शेती तयार होत असून कोरडवाहू शेतीत बळीराजा कामात गुंतला आहे पावसाला एक महिन्याचा अवधी असला तरी भाजावळ,कुंपणकाठी, बांधबंदीस्ती पालापाचोळा जाळणे, झाडेझुडपे तोडणी,झाडलोट शेतातील माती काढणे, गुरांंचा वाडासाकारणी कौलारु घराची साफसफाई वगैरे कामाला वेेेगआला आहे भारतकृषी प्रधान देश असल्याने याठिकाणची अर्थ व्यवस्था हि प्रामुख्याने शेती उत्पादनावर अवलंबून असली तरी शासनाच्या उदासीन धोरणांचा फटका हा शेतकरी वर्गाला बसतो अनेक योजना जाचक अटीमुळे लाभ मिळत नसला तरी भविष्याची चिंता करावी लागत असल्याने पारंपरिक शेती व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशिल रहात असल्याने शेतीच्या कामात व्यस्त झालेला पहायला मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा