तळा (किशोर पितळे)
जगात कोरोना विषाणूजन्य ससंर्ग रोगाने उच्छाद मांडला असून शासकीय यंत्रणा देखील तेवढ्याच ताकदीने संक्रमण रोखण्यासाठी प्रगती पथावरकामकरीत आहे.यारोगाच्यासावटाखाली संपूर्ण देशातील जनता वावरत असतानाच मात्र मोठ्या शहरात असणाऱ्या चाकरमान्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.तालुक्यातील अनेक कुटुंब गाव सोडून शहरात नोकरी व्यवसायासाठी गेली आहेत तालुक्यात रोजगार नसल्याने शेती विकूनशहरात गेली
लाँकडाऊन व संचारबंदी हाताला काम नसल्याने व दाम नसल्याने उपासमार होऊ लागल्याने पंचेचाळीस ते सतेचाळीस दिवसात अनेक चाकरमानी, विद्यार्थी, नातेवाईक आपल्या गावाकडे चालत,मिळेल त्या वाहनाने उन्हाची तमा न बाळगता बायका मुलं बाळ, म्हातारी माणसे देखील दररोज गावात येत आहेत. गावात येऊन देखील काँरन्टाईन कींवा होम काँरन्टाईन व्हावे लागत आहे. मुंबई,पुणा रेड झोन मधून रायगड आँरेज झोन मध्ये असल्याने शासनाने परवानगी दिली असल्याने मोठ्या प्रमाणावर गावाकडे लोक निघाली आहेत.पंचायत समिती कडून उपलब्ध आकडेवारी नुसार काल पर्यंत तेरा हजाराचा टप्पा पार केला असून कालच्या दिवस अखेरीस ७४४ चाकरमानी आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.एकूण २५ग्रामपंचायत व नगरपंचायत हद्दीसह१३४०९ इतके चाकरमानी आले आहेत सद्यस्थितीत मुंबईओस पडतचालली असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.परप्रांतीय आप आपल्याला गावाला तर आंतर राज्यातील जिल्ह्यातील मजूर, कामगार,वेठबिगारी गावाकडे निघालेआहेत.परंतु यांनी गुप्तपणे कोरोना आणला असेल यादृष्टीनेच ग्रामस्थ संशयीत नजरेने पहातआहेत.दुर्दैवाने एखाद्याने प्रसाद दिला तर मात्र सूरक्षीत असलेली जनता कोरोना च्या विळख्यात सापडल्या शिवाय रहाणार नाही. प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. नुकताच एक कोरोना पाँझेटिव्ह रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. यापुढे होऊच नये अशी अपेक्षा आहे परंतु शहरातून येणाऱ्या विविध भागातील चाकरमान्यांनी देखील गावात येऊन काळजी घेतली पाहिजे विना कारण गावात शहरात फिरणे धोक्याची घंटा वाजवू शकते, सँनीटायझरचा वापर,मास्क वापरणे,पंधरा दिवस शहरात गावात न फिरणे,सोशल डिस्टंट राखणे गरजेचे आहे आपल्या बरोबर आपल्या कुटुंबातील माणसांची, ग्रामस्थांची काळजी घेणे गरजेचे आवश्यक आहे. आपल्या कडे प्रशासनाची माणसे आल्यावरकोणतीही माहिती गुप्त राखू नये.महसूल विभाग,पंचायतसमिती कर्मचारी आशा वर्कस,ग्रामसेवक,पोलीस प्रशासन सतत कार्यरत असून प्रशासनाला सहकार्य करण्यात आपले सर्वांचे हिताचे ठरू शकते.
Post a Comment