अलिबाग, कर्जतमधून आज परप्रांतीय मजूरांना घेऊन 9 एसटी बसेस होणार रवाना



रायगड । लॉकडाऊनमुळे रायगडात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात परत जाण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागातून एसटी बसेस सोडण्यात येत आहेत. आज (11 मे) अलिबागमधून 5 तर कर्जतमधून 4 बसेस रवाना होणार आहेत. 
रा.प.रायगड विभागातून परप्रांतीय मजूरांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सोडण्याकरिता एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात आले आहे. आज अलिबाग आगाराकडून 4 वाजता 5 बसेस अक्कलकोटपर्यंत या मजूरांना सोडण्यासाठी रवाना होतील. तसेच कर्जत आगाराकडून 3 वाजता गोंदियासाठी 2 आणि रावेरसाठी 2 बसेस अशा एकूण 4 एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. 
एसटीमध्ये या मजूरांना बसविताना सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. तसेच एसटीत बसण्यापूर्वी पोलिसांच्या उपस्थितीत त्यांची तपासणी करुन मगच पुढे जाण्यास परवानगी देण्यात येत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा